Organic Farming Agowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

Natural Farming : जमिनीची सुपीकता आणि उत्पादनाचा दर्जा कमी होत चालला आहे. परिणामी शेतमालाला बाजारात समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडतो.

Team Agrowon

Nashik News : जमिनीची सुपीकता आणि उत्पादनाचा दर्जा कमी होत चालला आहे. परिणामी शेतमालाला बाजारात समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडतो. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज, असल्याचे मत आमदार नितीन पवार यांनी व्यक्त केले.

कृषी विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने दळवट (ता. कळवण) येथे शुक्रवारी (ता. १) सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार पवार यांनी आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन केले.

रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादनाला नाशिकसारख्या शहरात चांगला बाजारभाव मिळतो, असे त्यांनी सांगितले. नागली, वरई, भात, स्ट्रॉबेरी यासारख्या आदिवासी भागातील पिकांची सेंद्रिय उत्पादने बाजारपेठेत अधिक भावाने विकली जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कार्यक्रमात आत्मा नाशिकचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेदरम्यान आमदार पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे यांनी केले. राजेंद्र सावंत यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास कळवण नगराध्यक्ष कौतीक पगार, कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, माजी सभापती मधुकर जाधव, तालुका कृषी अधिकारी कळवण राजेंद्र गावित, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तीखे यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्राला भेट देण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी एकत्र येऊन आधुनिक शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा करावी, जमिनीची धारणा कमी होत असल्याने संरक्षित शेती म्हणजेच शेडनेट हाऊस, पॉली हाउससारख्या तंत्राधारित शेतीकडे वळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यासाठी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट द्यावी, तसेच सोशल मिडिया, युट्यूब, व्हॉट्सअॅप ग्रुप यांच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहनही आमदार पवार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture University : कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ वाऱ्यावर

Kharif Sowing : खेड तालुक्यात खरिपाच्या ६७ टक्के पेरण्या

Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT