Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विमा रक्कम देण्याचे आदेश

Crop Insurance Advance : सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले होते.

Team Agrowon

Hingoli News : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादन हे उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी येत असल्याचे संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

या स्थितीत पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) या जोखीमबाबीअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांतील सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी विमा कंपनीला दिले आहेत.

जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार क्षेत्रीय संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्व ३० महसूल मंडलांमध्ये सोयाबीन पिकामध्ये मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत आहे.

त्यामुळे संबंधित विमाधारकांना पीक नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्याचे आदेश सोमवारी (ता.१६) मंजूर करण्यात आले. पंतप्रधान पीक हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान ही जोखीम लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्व्हेक्षणानुसार सोयाबीन पिकाचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या (उंबरठा उत्पादन) तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी आल्याचे निदर्शनास आले आहे. तूर व कापूस पिकांच्या नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट दिसून आली नाही.

शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नुकसानीचा अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत वरील तरतुदीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल. बैठकीतील चर्चेनुसार तसेच प्राप्त सर्व्हेक्षण अहवालानुसार अधिसूचित पीकविमा क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के अग्रिम (आगाऊ) रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एचडीएफसी ईरगो कंपनी लि. यांना जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या मान्यतेने जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT