Orange Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Rate : वाशी बाजार समितीत संत्री ४० रुपये किलो

Vashi APMC : थंडीची चाहूल लागताच बाजारात संत्र्यांच्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. सध्या वाशीतील एपीएमसीत नागपूर आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात संत्री दाखल झाली आहेत.

Team Agrowon

Vashi News : थंडीची चाहूल लागताच बाजारात संत्र्यांच्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. सध्या वाशीतील एपीएमसीत नागपूर आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात संत्री दाखल झाली आहेत. त्यामुळे दरही काहीसा घसरला असून चवीला आंबट-गोड असणारी संत्री सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आली आहेत.

मंगळवारी (ता. २९) वाशीतील एपीएमसीत ५,१६० क्विंटल संत्र्यांची बंपर आवक झाली आहे. त्यामुळे भाव काहीसे कमी झाले आहेत. आठवडाभरापूर्वी ३० ते ७० रुपये किलोने विकली जाणारी संत्री सध्या ४० ते ५० रुपये किलोने विकली जात आहेत. तर आकाराने लहान संत्र्यांचा भाव २० ते ३० रुपये प्रतिकिलो आहे.

अवकाळीचाही फटका

यंदा नागपूर आणि नगर जिल्ह्यात संत्र्यांचे उत्पादन चांगले झाले असले तरी अवकाळी पावसाचा फटका याला बसल्याचे उत्पादक शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे संत्री बाजारात येण्यास काहीसा उशीर लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांनी संत्र्यांची वेळेआधीच तोडणी केल्याने संत्री पूर्णपणे तयार झालेली नाहीत. त्यामुळे बाजारात येईपर्यंत बरीचशी खराब झाल्याने फेकून दिली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, तरीही येत्या काळात आवक वाढून चांगला भाव मिळेल, असा विश्‍वास शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा संत्र्यांचे दर कमी झाले आहेत. बाजार समितीत महिनाभरापासून कमी-अधिक प्रमाणात महाराष्ट्रातून संत्र्यांची आवक होत असून बाजारात उठाव मिळण्यास सुरुवात झाली आहे.
मोहम्मद बशीर, फळ व्यापारी, एपीएमसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT