Amravati News : अमरावती ः यंदाच्या खरीप हंगामात जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या सततच्या पावसाने अमरावती जिल्ह्यातील ३७ हजार ३९३ हेक्टर क्षेत्रातील संत्रा फळबागा बाधित झाल्या आहेत. त्याचा थेट फटका ४१ हजार ९११ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी १३४.६१ कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. जुलै व ऑगस्टमध्ये सातत्याने ढगाळ वातावरण राहून सतत पाऊस झाल्याने त्याचा थेट फटका संत्रा बागांना बसला. फळगळ मोठ्या प्रमाणावर झाली.
अनेक उपाययोजना करूनही फळगळ शेतकऱ्यांना थांबविणे नैसर्गिक आपत्तीपुढे शक्य झाली नाही. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पंचनामे करून मदतीची अपेक्षा शासनाकडे व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात जिरायती व बागायती पिकांचे नुकसान झाले नसल्याचे समोर आले. मात्र संत्राफळांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल समोर आला. जिल्ह्यातील ३६ हजार ८४१ हेक्टर क्षेत्रातील संत्रा, ७.९ हेक्टरमधील मोसंबी व ५४४ हेक्टरमधील लिंबूची फळगळ झाली आहे.
या फळ उत्पादक ४१ हजार ९११ शेतकऱ्यांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने व आचारसंहिता लागू झाल्याने ही मदत प्रत्यक्षात मिळण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना अनुदान प्राप्तीसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.
तालुकानिहाय नुकसानाची स्थिती तालुका क्षेत्र (हेक्टर) शेतकरी अनुदान
मोर्शी ६३९७ १०,२९५ २३.०२
चांदूररेल्वे १०२८ १४१४ ३.७०
भातकुली ७.२० २० ०.०२५
चिखलदरा ७०.८१ १२३ ०.०२५
तिवसा २९०८ २४६० १.०४
वरुड २१,४०२ २०,५८९ ७७.०४
अमरावती ९२२ १०३३ ३.३१
अंजनगावसुर्जी ३३७५ ४२०९ १२.१५
धामणगावरेल्वे १०२६ १३७८ ३.६९
नांदगाव खंडेश्वर २५६ ३९० ९.२२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.