Orange Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Processing : संत्रा प्रक्रिया प्रकल्प गेमचेंजर ठरेल ः पवार

Ajit Pawar : विदर्भातील संत्रा उत्पादकांना रास्त भाव देण्यासाठी वरुड-मोर्शी येथील अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : ‘‘विदर्भातील संत्रा उत्पादकांना रास्त भाव देण्यासाठी वरुड-मोर्शी येथील अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. हा प्रकल्प संत्रा उत्पादकांसाठी गेम चेंजर ठरेल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच ‘‘या प्रकल्पासाठी निधी दिला जाईल,’’ असेही ते म्हणाले.

पवार यांनी वरुड-मोर्शी (जि. अमरावती) येथे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबतची आढावा बैठक गुरुवारी (ता. १५) श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

या वेळी आमदार देवेंद्र भुयार, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (दूरदृष्य प्रणालीव्दारे), महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे संचालक मंगेश गोंदवले, पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. केदार जाधव, अमरावती कृषी विभागाचे सहसंचालक के. एस. मुळे, विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनीचे अमित जिचकर आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘अमरावती विभागात संत्रा लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. तेथील संत्रा उत्पादकांना काही वेळेस अत्यल्प दरात संत्रा विक्री करावी लागते. संत्र्यांवर अत्याधुनिक सयंत्राद्वारे प्रक्रिया करून ज्यूस कॉन्सट्रेट, इसेन्शिअल ऑइल, पिल पावडर, पशू खाद्य, ज्यूस, टेट्रापॅक ज्यूस, पेंट बॉटल इत्यादी प्रकारची वेगवेगळी उत्पादने केल्यास त्यापासून शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मिळू शकतो.’’

‘‘संत्रा उत्पादकांना न्याय देण्यासाठी वरुड-मोर्शी येथे विदर्भ अग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनी आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळासमवेतच्या भागीदारीद्वारे संयुक्त उपक्रम म्हणून संत्रा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येईल. संत्रा उत्पादकांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक निधीही देण्यात येईल,’’ अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT