Orange Orchard Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Orchard Damage : अवकाळी पावसाने संत्रा बागांचे नुकसान

नुकसानीचे पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकर द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे (Stormy Rain) रब्बी पिकांसह (Rabi Crop) फळबागांचे नुकसान (Orchard Damage) झाले.

या भागात संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून मदत (Crop Damage Compensation) मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

झालेल्या नुकसानाचे पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकर द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.

या भागात ६ मार्चला वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने संत्रा पिकाचे नुकसान झाले. तोडणीसाठी आलेली संत्रा फळे जमिनीवर पडली. यामुळे संत्रा उत्पादकांवर मोठे संकट ओढावले आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार कृषी सहायक व तलाठ्यांकडून पंचनामे करण्यात आले आहेत. तरी प्रशासनाने आम्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक भगवान भांदुर्गे यांनी केली आहे.

या भागात इतरही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. काढणीला आलेला गहू जमिनीवर लोळला तर हरभरा पिकाचेही नुकसान झाले आहे. या सर्वच शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Udgir APMC : उदगीर बाजार समितीचे माजी सभापती हुडेंसह दोघे अपात्रच

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

Rainfall Deficit : पावसाची तूट; दुष्काळाचे सावट गडद

New Municipal Corporations: पुण्यात तीन नवीन महानगरपालिकांची गरज; अजित पवार

SCROLL FOR NEXT