Orange  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Farmer : संत्रा उत्पादक संकटात

Orange Fruit : या वर्षी पहिल्यांदाच मृग बहराच्या संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. संत्रा झाडांची पाने पिवळी पडून झाडे वाळत चालली आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : या वर्षी पहिल्यांदाच मृग बहराच्या संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. संत्रा झाडांची पाने पिवळी पडून झाडे वाळत चालली आहेत. संत्र्यावर संशोधन करण्यासाठी संस्था तसेच स्वतंत्र विभाग कार्यरत असतानाही संबंधितांकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन होताना दिसत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक संकटात सापडला आहे.

मोर्शी- वरूड तालुक्यात भीषण दुष्काळातून अथक परिश्रम घेऊन जगविलेल्या संत्रा बागांवर बदलत्या वातावरणाने रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. यामुळे संत्र्यांची गळती होत आहे. यावर उपाययोजना करून काही उपयोग होत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.

यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. झाडे पिवळी पडून सुकत आहेत. झाडावरील फळेही पिवळी पडत आहेत. रोग नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्यामुळे संत्रा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

मोर्शी- वरूड तालुक्यातील संत्रा फळबागांची पाहणी करून उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी संत्रा गळतीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.

या साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी खराब झालेला संत्रा थेट शासनाला पाठवून शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध व्यक्त केला. तसेच संत्रा धोरण ठरविण्याची मागणी केली. आठ दिवसांत संत्रा उत्पादकांच्या बांधावर न पोहचल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT