Rain Orange Alert Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Rain Orange Alert Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा इशारा

IMD Alert Kolhapur : हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के.एस.होसाळीकर यांनी पावसाचा जमीनीतील ओलावा बघावी असा सल्ला राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.

sandeep Shirguppe

Monsoon Rain : मॉन्सूनची वाटचाल गतीमान झाल्याने बळीराजा खरिपाच्या पेरणीकडे वळत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. दरम्यान मागच्या काही दिवसात झालेल्या पावसाने शेतकरी पेरणी करत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे तर काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढचे काही दिवस पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा, सोलापूर जिल्ह्यात पावसाचे अलर्ट असल्याची माहिती हवामान विभागाकडून दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे ३ दिवस पावसाचे सांगण्यात आले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर वादळी पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

उद्या रविवार (ता.०८) आणि सोमवार (ता.०९) पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात येलो अलर्ट तर सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस येलो आणि ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के.एस.होसाळीकर यांनी पावसाचा जमीनीतील ओलावा, वातावरण आणि पावसाचा अंदाज पाहूनच पेरणीची घाई करावी, अन्यथा पावसाची वाट बघावी, असा सल्ला राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे. गतवर्षापेक्षा यंदा नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे.

यंदा मान्सूनवर ‘ला निना’चा प्रभाव असल्याने समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. दरम्यान यंदाच्या पावसाच्या हंगामात मध्य भारत आणि दक्षिण द्विपकल्पीय भारतात पावसाचे प्रमाण सर्वसामान्यपेक्षा अधिक असणार आहे. जून महिन्यात राज्यात अधिक पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. याचा बळीराजाला देखील चांगलाच फायदा होणार आहे असे होसाळीकर म्हणाले.

तर दुबार पेरणीचे संकट

सध्या मॉन्सून पूर्व आणि मॉन्सूनचा पाऊस काही ठिकाणी जोरदार होत आहे. परंतु हा पाऊस पुढच्या काही दिवसात थांबू शकतो यानंतर जुलै महिन्यात पाऊस सुरू झाल्यास पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. यामुळे १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. तसेच कमी पावसात पेरणी केल्यास शेतीत किडीचा जोरदार प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing: देशातील खरीप पेऱ्यात चार टक्के वाढ

India Monsoon 2025: देशात सरासरी पाऊसमान, वितरण मात्र असमान !

Monsoon Rain: राज्यात वाढणार पावसाचा जोर

Farmer Incentive Subsidy Scheme : पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले

Kukadi Water Storage: ‘कुकडी’त ६८ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT