Maharashtra Budget Session 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Session : विरोधकांना निधी का मिळत नाही?, रोजगार हमी मंत्र्यांना घेरलं

Monsoon Session Day 3 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी निधी वाटपावरुन रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांना धारेवर धरले.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Session LIVE : महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाच्या काल दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आज तिसऱ्या दिवशी विधिमंडळात रोजगार हमी योजनेचा मुद्दा गाजला. यावेळी विरोधकांनी मंत्री संदीपान भुमरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. कुशल स्वरुपाच्या कामांच्या निधीवरून सभागृहात गोंधळ सुरू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना मध्यस्थी करावी लागली.

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी रोजगार हमी योजनेसंबंधित विषय मांडला. योजनेतील कुशल कामांचे पेमेंट १ वर्षापासून मिळत नाही. अधिकाऱ्यांकडून नियम पाळले जात नाही. सर्वसामान्य माणसांसाठी असलेल्या योजनेत अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार होत नाही.  कुशल कामांचे रखडलेले पेमेंट कधी मिळेल?, भुसर्वेक्षण विभागाकडील अनेक पदे रिक्त आहेत. ती भरणार आहात की नाही? , असा सवाल केला.

काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात अनेक भागांमधील रोजगार हमी योजनेचे निधी मिळाला नाही. तसेच फडणवीस सरकारच्या काळातील धडक सिंचन योजनेसाठीचा २०१९ पासून निधी मिळाला नाही. तो कधी मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला.

यशोमती ठाकूर म्हणाल्या ,  भुमरे महाविकास आघाडी सरकारपासून रोजगार हमी मंत्री आहेत. पण तुम्ही लोक वेगळे झाल्यापासून सत्ताधारी आमदारांचे पैसे निघतात. पण विरोधकांचे पैसे निघत आहे.  विरोधी बाकावर बसलेल्या आमदारांचे निधी का वितरित होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना संदीपान भुमरे यांनी सांगितले. कुशलाचा निधी सर्वांना मिळतो. विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. निधी सगळ्यांना दिला जातो. असे कुठे होत असल्यास निदर्शनास आणून द्या, असे सांगितले.

निधी वाटपावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केली. कुशल-अकुशल निधी संदर्भात ज्या काही हरकती आहे. त्याबाबत मी सभागृहाला शब्द देतो, १५ आॅगस्टपर्यत निधी देतो. कोणाचाही निधी शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव

Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा

Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT