Dr. Shrikrushna Panchal Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Industry : ‘रेशीम उद्योगात उत्पन्न वाढविण्याची संधी’

Dr. Shrikrushna Panchal : रेशीम उद्योगात प्रक्रिया सुरू करून आर्थिक उत्पन्न वाढविण्याची संधी आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले.

Roshan Talape

Jalna News : महिला महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी पुढाकार घेऊन चॉकी कीटक संगोपन, निर्जंतुकीकरण पथक, तुतीचे उर्वरित काड्यांपासून कंपोस्ट खत तयार करणे, रेशीम धागा रंगनी करून विणकामासाठी तयार करणे,

हातमागवर रेशीम कपडाचे विणकाम करणे आदी प्रक्रिया सुरू करून आर्थिक उत्पन्न वाढविण्याची संधी आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले.

महारेशीम अभियानांतर्गत शेतकरी मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रम घनसावंगी येथील रयतेचे स्वराज्य चॉकी केंद्र येथे घेण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी, छत्रपती संभाजीनगरचे रेशीम विकास अधिकारी बबनराव डेंगळे,

जालन्याचे रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, उपविभागीय कृषी अधिकारी रामेश्‍वर रोडगे, तहसीलदार योगिता खटावकर, तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ, रेशीम विभागाचे कर्मचारी एस. आर. जगताप उपस्थित होते.

महारेशीम अभियानांतर्गत जालना जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक १,७६२ एकरची नोंदणी केल्याबद्दल संबधित अधिकारी -कर्मचाऱ्यांचे अभिनंदन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी केले. रेशीमरत्न भाऊसाहेब निवदे यांचे रयतेचे स्वराज्य चॉकी केंद्राचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते पार पडले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कापसे म्हणाले, की शेतकऱ्यानी पीक पद्धतीमध्ये बदल करून रेशीम शेतीचा अवलंब करून आपले उत्पन्न वाढवावे. प्रगत रेशीम शेतकरी संदीप लोंढे, सिद्धेश्‍वर भानुसे, बोरगावचे भागवत भानुसे, विश्‍वंभर तिडके, अण्णासाहेब चांदर, रूषी तांगडे यांनी आपले रेशीम शेतीमधील उत्पन्न व त्यामुळे झालेली प्रगतीचे अनुभव कथन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

Fake PM Kisan Link : शेतकऱ्यांनो, खोट्या मेसेज अन्‌ लिंकपासून सावध राहा

Heavy Rain Marathwada : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील ७३ मंडलांत धो-धो पाऊस

7/12 Land Records: सातबारा उताऱ्यावरील नोंदींसाठी नवीन नियंत्रण कक्ष; आता एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही

Swamitva Yojana : बासष्ट हजार जणांना मिळाली मिळकत पत्रिका

SCROLL FOR NEXT