Citrus Estate  Agrowon
ॲग्रो विशेष

Citrus Estate : पाच कोटींच्या व्याजातून चालणार सिट्रस इस्टेटचा कारभार

Fund For Citrus Estate : निधीअभावी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिट्रस इस्टेटच्या कामासाठी साडेसहा कोटी रुपयांची उपलब्धता करण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : निधीअभावी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिट्रस इस्टेटच्या कामासाठी साडेसहा कोटी रुपयांची उपलब्धता करण्यात आली आहे. परिणामी या कामाला गती येण्याची शक्‍यता वर्तविली जात असून यातील पाच कोटी रुपये मुदतठेवी (फिक्‍स्ड डिपॉझिट) अंतर्गंत ठेवण्यात आले आहेत. यावरील व्याजाच्या आधारे सिट्रस इस्टेटचे कामकाज चालविण्यात येणार आहे.

पंजाबच्या धर्तीवर संत्रा उत्पादकांना लागवड ते विपणन अशा सर्वच टप्प्यात संत्रा बागायतदारांना मार्गदर्शन मिळावे याकरिता सिट्रस इस्टेटची संकल्पना मांडण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी याची घोषणा करण्यात आली. परंतु ‘ना निधी, ना नियोजन’ यामुळे सिट्रस इस्टेट केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याची स्थिती आहे. या संदर्भात ‘ॲग्रोवन’मधून सातत्याने लिखाण करण्यात आले.

त्याची दखल घेत आयुक्‍तालयाच्या स्तरावरून राज्यभरात सिट्रस इस्टेटकरिता निधीची उपलब्धता केली गेली. चांदूरबाजार (अमरावती) येथे कृषी विभागाच्या टीएसएफ प्रक्षेत्रावर सिट्रस इस्टेटचे काम प्रस्तावीत आहे. परंतु निधीच नसल्याने हे काम पुढे सरकत नव्हते. आमदार बच्चू कडू यांनी या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर नुकताच साडेसहा कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील पाच कोटी रुपये बॅंकेत मुदत ठेवीअंतर्गंत जमा करण्यात आले आहेत.

या र‍कमेवरील व्याजातून या ठिकाणी सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार करणे त्यासोबत इतर सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना लागवड साहित्य (रोप) पुरवठा तसेच इतर तांत्रिक सेवा सशुल्क मिळणार आहेत. या पैशाचा उपयोग देखील सोयीसुविधा बळकटीकरणासाठी केला जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

संत्रा बागेतील कीडरोगाचा प्रादुर्भाव व त्याच्या नियंत्रणासाठी झाडांच्या विविध घटकांचे पृथ्थकरण करावे लागणार आहे. त्यासाठी आधुनिक सयंत्राची उपलब्धता असलेल्या प्रयोगशाळांची उभारणी देखील केली जाणार आहे.

साडेसहा कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, यातील पाच कोटी मुदतठेवी (फिक्‍स्ड डिपॉझिट)अंतर्गत बँकेत जमा करण्यात आले आहेत. दीड कोटी रुपये इतर सेवा सुविधांवर खर्च होतील. त्यामध्ये अवजार बॅंक हा घटक महत्त्वाचा आहे. काही अवजारांची खरेदी करण्यात आली आहे. सिट्रस इस्टेट अंतर्गंत शेतकऱ्यांची नोंदणी देखील केली जात आहे.
- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT