Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा

Nana Patole : शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजप सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहिरातबाजी करत आहे.

Team Agrowon

Mumbai News : ‘‘पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे नुकसानकारक ठरले आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजप सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहिरातबाजी करत आहे.

बुधवारी (ता. २९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ देखावा आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, ‘‘सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामही वाया गेला आहे. पाऊस व गारपिटीने शेतीमालाचे मोठे नुकसान केले आहे. शेतातील उभी पिके, द्राक्ष, संत्रा, कांदा, सोयाबीन, तूर, धान, कापूस सर्व पिके वाया गेली आहेत.

शेतकरी संकटात असताना सरकारने तत्काळ मदत जाहीर करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली पाहिजे. या आधी जाहीर केलेली मदतही शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे.

सरकारच्या तिजोरीतून विमा कंपन्यांचे खिसे भरले आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.’’

‘मराठा-ओबीसी वाद सरकारचा कार्यक्रम’

‘‘राज्यात मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपनेच आरक्षणाचे आश्वासन दिले होते, पण आता ते आरक्षण देण्यास चालढकल करीत आहेत. आरक्षण प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाजात जाणीवपूर्वक भांडणे लावली जात आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम भाजप करत आहे. आरक्षण प्रश्नावरून मंत्रिमंडळातील मंत्र्यांची भांडणे ही सुद्धा सरकारचा ठरवून सुरू असलेला कार्यक्रम आहे,’’ असेही पटोले म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT