Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Narendra Modi : स्थिर सरकार देण्यासाठी महायुतीच समर्थ : नरेंद्र मोदी

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय असणारी, व्हिजन असणारी एकमेव महायुतीच महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकते आणि तीच महाराष्ट्राच्या विकासासाठी दूरगामी फायद्याची ठरणार आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : ‘‘महाराष्ट्रात असलेल्या महाविकास आघाडीच्या गाडीला धड चाक आहे, ना ब्रेक आहे. त्यात ती कोण चालवणार, यासाठी मारामारी आहे. आपापसांत भांडण करण्यातच त्यांचा वेळ चालला आहे. त्यामुळे ही आघाडी कधीच स्थिर सरकार देऊ शकणार नाही. महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय असणारी, व्हिजन असणारी एकमेव महायुतीच महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकते आणि तीच महाराष्ट्राच्या विकासासाठी दूरगामी फायद्याची ठरणार आहे,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.१२) येथे सांगितले.

भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची शहरातील होम मैदानावर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजप महायुतीचे जिल्ह्यातील सर्व ११ उमेदवार या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, की काँग्रेसने देशावर अनेक दशके राज्य केले. पण त्यांचा एकच विचार होता, समस्या सोडविण्याऐवजी तशाच ठेवायच्या. वर्षानुवर्षे त्यांचा हा एकच विचार होता, आपण आठवून पाहा. समस्या कायम ठेवणे, ही जणू त्यांची कार्यशैली राहिली आहे. काँग्रेसच्या या विचारधारेनेचे शेतकऱ्यांना बेहाल केले. शेतीच्या पाण्यासाठी किती वर्षे तरसावले.

सोलापूरसह राज्यातील अनेक सिंचन योजनांना आम्ही निधी दिला, आता तर शेतीपंपाचे वीजबिलही पूर्णपणे माफ केले आहे. सौरऊर्जेला प्रोत्साहन दिले जाते आहे. साखर कारखानदारांचे प्रश्‍न सोडवले. इथेनॅालचे मिश्रण ५ टक्क्यांवरून आता १५ टक्क्यांवर नेले आहे. पूर्वी हे प्रश्‍न नव्हते का, तर होते. पण ते सोडविण्याची त्यांची मानसिकताच नव्हती, अशा शब्दांत जोरदार काँग्रेसवर टीका केली.

‘शेतकरी, महिलांसाठी काम हे आमचे समाधान’

भाजप महायुती आहे तर राज्याची प्रगती आहे, विकासाला गती आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला देखील माहिती आहे. या निवडणुकीनंतरही राज्यात भाजप महायुतीचे सरकार स्थापन होईल. कारण या निवडणुकीसाठी चांगल्या पद्धतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये लाडक्या बहि‍णींसाठी, युवकांसाठी आणि विकासासाठी एकापेक्षा एक असे अनेक चांगले संकल्प करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील डबल इंजिनच्या सरकारमुळे दुप्पट वेगाने विकास होतो आहे. या दिवाळीत हातात पैसे मिळाल्याने महिलांनी दिवाळी जोरात साजरी केली. शेतकऱ्यांसाठीही आम्ही काम करतो आहोत. शेतकऱ्यांना तर केंद्राकडून पीएम किसान सन्मान आणि राज्याकडून नमो सन्मान निधी असा दुहेरी लाभ मिळतो आहे,’’ असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा दर स्थिर; गाजर- भेंडीचे दर टिकून, आले दरात सुधारणा तर उडदाचे दर कमी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमिनीच्या मोजणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

Mulberry Cultivation : सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले तुती लागवडीचे क्षेत्र

Dudhana Dam Water Level : निम्न दुधना प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा

Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

SCROLL FOR NEXT