Prime Minister Narendra Modi : 'आमचा एकच संकल्प शेतकऱ्याला देशाच्या प्रगतीचा नायक म्हणून उदयास आणणे' : पंतप्रधान मोदी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोल्यात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (ता.९) जाहीर सभा झाली.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारांचा धुरळा उडत आहे. शनिवारी (ता९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील महायुतीच्या १५ उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. यावेळी मोदींनी, आमचा एकच संकल्प असून शेतकऱ्याला खंबीर बनवणे, त्याला देशाच्या प्रगतीचा नायक म्हणून उदयास आणण्याचा असल्याचे म्हटले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, प्रफुल पटेल, आनंदराव अडसूळ यांची उपस्थिती. .

पुढे मोदी म्हणाले की, माझ्यासाठी नेहमीच विदर्भाचे आशीर्वाद खास राहिले असून आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत महाआघाडीसाठी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आज ९ नोव्हेंबर असून आजच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निर्णय दिला होता. यानंतर राष्ट्र प्रथम ही भावना भारताच्या प्रत्येक धर्माच्या लोकांनी दाखवली.

Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi :'आम्ही पूर्वीपेक्षा तिप्पट मेहनतीने काम करू' : मोदी यांचे आश्वासन

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी चालना

अकोला जिल्हा कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. कापूस हा वस्त्रोद्योगाचा प्रमुख आधार असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. अनेक दशकांपासून तो दिला गेला नाही. पण आता आमच्या सरकारमुळे ही परिस्थिती बदलत आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उद्योग आणि पायाभूत सुविधांना चालना देण्यात येत आहे. आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवत असून त्याचा खर्च देखील कमी करत आहोत. आम्ही पीएम किसान सन्मान निधी योजना आणली. त्याला राज्यातील महायुतीने पाठिंबा दिला. यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रूपये मिळत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

Prime Minister Narendra Modi
Vidhan Sabha Election 2024 : शेतकरी संघटना उमेदवार उभे करणार : रघुनाथदादा पाटील

महाराष्ट्राचा विकास दुप्पट वेगाने

महायुती सरकारच्या पुढील ५ वर्षांचा कार्यकाळ कसा असेल याची झलकही महायुतीच्या वचननाम्यात दिसते, असे पीएम मोदी म्हणाले. महिलांची सुरक्षा आणि महिलांना संधी, माझी लाडकी बहिन योजनेचा विस्तार, तरुणांना लाखो नोकऱ्या, मोठी विकासकामे. महायुतीचे सरकार महाराष्ट्राचा विकास दुप्पट वेगाने पुढे नेणार आहे.

आमच्या सरकारने केवळ ५ महिन्यात लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले. त्यात महाराष्ट्राशी संबंधित पायाभूत सुविधांचे प्रकल्पही मोठ्या प्रमाणात आहेत. बावधन बंदराची पायाभरणी यातील एक असून जे मोठे आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची महाराष्ट्रातील जनतेची मागणी काँग्रेसने अनेक दशके पूर्ण होऊ दिली नाही. ती आम्ही पूर्ण केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे सौभाग्य मला मिळाले.

Prime Minister Narendra Modi
Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

काँग्रेसवर हल्लाबोल

यावेळी मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना, महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, महाआघाडी म्हणजे पैशांची उधळपट्टी, महाआघाडी म्हणजे ट्रान्सफर पोस्टिंगचा धंदा, महाआघाडी म्हणजे टोकन मनी, अशी टीका केली आहे. तर जितकी काँग्रेस मजबूत होईल, तितका देश कमकुवत होईल, असे म्हटले आहे. तसेच काँग्रेस स्वभाव हा विविध जातींमध्ये भांडणे लावण्याचा असून काँग्रेसने स्वातंत्र्यापासून दलित समाजाला कधीही एकत्र येऊ दिले नाही. ओबीसीची चीड काँग्रेसला असल्याची टीका देखील मोदींनी केली आहे.

तसेच जिथे काँग्रेसचे सरकार असते, ते राज्य काँग्रेसच्या राजघराण्याचे एटीएम बनते. सध्या हिमाचल, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये काँग्रेसच्या राजघराण्याची एटीएम बनली आहेत. महाराष्ट्रात निवडणूक होत असताना कर्नाटकातील संकलन दुप्पट केले जात आहे. या लोकांनी कर्नाटकातील दारू दुकानदारांकडून ७०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com