Jal Jivan Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’च्या ९५ योजनांच पूर्ण

Water Scheme : या योजनांचे काम २०२४ पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र आतापर्यंत ९५ योजनांचीच कामे पूर्ण झाली आहेत. तर ७४ योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

Team Agrowon

Raigad News : जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक हजार ४२२ पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनांचे काम २०२४ पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र आतापर्यंत ९५ योजनांचीच कामे पूर्ण झाली आहेत. तर ७४ योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

तर काही ठिकाणी अद्याप योजनांची कामे सुरूही झालेली नाहीत. त्यामुळे नळ जोडणी होऊन घराघरांत पाणी कधी येणार, असा प्रश्‍न जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलावर्ग विचारत आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करून सत्ताधारी पक्ष श्रेय लाटण्याच्या प्रयत्‍नात असल्‍याचे बोलले जात आहे. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांकडूनच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव वाढू लागला आहे.

त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर प्रत्येक तालुक्यात जाऊन कामांचा आढावा घेत आहेत. जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे तसेच महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन योजना राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत हर घर नल से जल या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात दोन वर्षांपासून काम सुरू आहे.

योजनेच्या माध्यमातून १५ तालुक्यांमध्ये एक हजार ४२२ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील ९५ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. याशिवाय काम सुरू ना करणाऱ्या २६ योजनांचा ठेका केला असून यात पनवेल तालुक्यातील १५ योजना असून, कर्जत ३, महाड १, अलिबाग २, उरण ३, मुरुड २ योजनांचा समावेश आहे.

९५ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. महिनाभरात ७४ योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना ठेकेदार-अधिकारी यांना दिल्‍या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.
- डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड
एक हजार ४२२ योजनांसाठी साधारण एक हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. कामांच्या वाटपापासूनच यात भ्रष्टाचार झाला आहे. ज्या योजना पूर्ण झाल्याचे दाखवले जात आहेत, त्या जुन्याच असून रंगरंगोटी करून नव्या दाखवल्या आहे. तर ज्‍या योजना पूर्ण होत आहेत, त्यांना पुरेसे पाणीच नसल्‍याने कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्‍यता आहे.
- संजय सावंत, माहिती अधिकार कार्यकर्ता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT