Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : खेड तालुक्यात खरिपाच्या ६७ टक्के पेरण्या

Kharif Season 2025 : गेली काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील पारंपरिक असणाऱ्या भुईमूग, बाजरी, बटाटा, कडधान्य पिके यांच्याकडे शेतकरी दुर्लभ करत आहे.

Team Agrowon

Pune News : ऑगस्ट महिना सुरू झाला तरी खेड तालुक्यात खरीप हंगामात फक्त ६७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या झालेल्या पिकांची स्थितीही समाधानकारक नसल्याचे चित्र आहे, सर्वाधीक उत्पादन असणाऱ्या पिकामध्ये भाताची ८८.६९ टक्के क्षेत्रावर तर सोयाबीनची ७६.०९ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

एकंदर स्थिती असून एकूण खरीप हंगामाचे क्षेत्र ५१९८३.०९ हेक्टर असून सरासरी पेरण्या ३५०८५.१५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून त्याचे प्रमाण ६७.४९ टक्के असल्याचे खेड तालुका कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पावासाच्या लहरीपणाला आता शेतकरी वैतागला आहे.

चालू वर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना ना पेरणीपूर्व मशागतींना वेळ मिळाला ना भात पिकाच्या रोपांसाठी भाजणीला. मुसळधार पावसामुळे शेतीची कामे रखडली, पाण्याचा निचरा न झाल्याने खरीप हंगाम हातचा गेला अशा स्थितीत असताना पावसाने उघडीप दिल्याने उपलब्ध क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पिके येतील या आशेवर पेरण्या करण्यास तसेच भात पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली.

गेली काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील पारंपरिक असणाऱ्या भुईमूग, बाजरी, बटाटा, कडधान्य पिके यांच्याकडे शेतकरी दुर्लभ करत आहे. दिवसेंदिवस सोयाबीन पिकाकडे जास्त ओढा दिसून येतो आहे. चालू वर्षी पिकांच्या पेरण्याच रखडल्याने सद्यःस्थितीत खरीप अहवाल कृषी विभागाकडून प्राप्त झाला आहे.

खरीप हंगामातील पिकाचे सरासरी क्षेत्र तर कंसात हेक्टरी पेरणी झालेले क्षेत्र व टक्केवारी हेक्टरी -

पीक..........सरासरी क्षेत्र.........हेक्टरी पेरणी............टक्केवारी

भात....... ७७५०.०२..........६८७३.३०..........८८.६९

ज्वारी..........३२.०८..........०...........०

बाजरी..........६३१.०६..........०...........०

मका..........३३०३..........२६६३.००..........८०.६२

तूर..........११९.०४..........७.७०..........०६.४५

मुग..........१९३.०१..........१४.१०..........०७.३०

उडीद..........१०९.०८..........०४.००..........०३.६४

भुईमूग..........१६५०..........३३५.७०..........२०.३५

तीळ..........० ..........०...........००

सोयाबीन..........१८९६०..........१४४२६.००..........७६.०९

कांदा..........९ ..........०...........०

बटाटा..........४५००..........७६२.००..........१६.९३

टोमॅटो..........५७८ ..........१०५.५०..........१८.२५

चारापिके.........४६७१.........४२२०,००.........९०.३४ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: टॅब खरेदीच्या हालचाली शंकास्पद

Kharif Onion Cultivation: खरीप कांदा लागवड क्षेत्रात ५० टक्क्यांनी घट

Turmeric Crop Loss: देशातील हळदीला पावसाचे ग्रहण

Cotton MSP Procurement: कापसाची हमीभावाने एक ऑक्टोबरपासून खरेदी

Agriculture GST : जीएसटी परिषदेत १२ व २८ टक्के स्लॅब रद्द; शेती अवजारे, ट्रॅक्टर, ठिबकवर ५ टक्के जीएसटी

SCROLL FOR NEXT