Kharif Sowing : नऊ हजार हेक्टरने क्षेत्र घटले

Kharif Season : खरीप हंगामातील पेरणी आटोपली असून जिल्ह्यात यंदा सहा लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. एकूण सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ती ९७ टक्के आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : खरीप हंगामातील पेरणी आटोपली असून जिल्ह्यात यंदा सहा लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. एकूण सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ती ९७ टक्के आहे. गत खरिपाच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्रात नऊ हजार ६०३ हेक्टरने घट आली आहे. या वर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

जूनमध्ये सुरुवातीला थोडा बरसल्यानंतर अवकाश घेतल्याने पेरण्या रखडल्या होत्या. त्या जुलैमधील पावसाने वाढल्यात. खरिपाची पेरणी आता आटोपली असून जिल्ह्यात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात खरिपासाठी सरासरी सहा लाख ८२ हजार ९९२ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ६ लाख ६७ हजार ५५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा गतवर्षीपेक्षा नऊ हजार ६०३ हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आलेले नाही.

Kharif Sowing
Kharif Sowing : अहिल्यानगरला ६ लाख ७६ हजार हेक्टरवर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

चौदापैकी तेरा तालुक्यांत पेरणीक्षेत्रात घट झाली असून धामणगाव रेल्वे तालुक्यात मात्र गतवर्षीच्या तुलनेत ७७० हेक्टरने पेरणीक्षेत्र वाढले आहे. पीकनिहाय पेरणीत कापूस व मक्याचे क्षेत्र वाढले असून सोयाबीन, तूर, मूग, उडीद व ज्वारीच्या क्षेत्रात घट आली आहे. मक्याच्या क्षेत्रातील वाढ लक्षणीय आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : चंद्रपूर जिल्ह्यात तीन लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या

तालुकानिहाय पेरणीक्षेत्र (घट)

धारणी ः ४९,७९४ ( ५१५), चिखलदरा ः २३,७६६ (८८७), अमरावती ः ५१,१२३ (५२९), भातकुली ः ४८,६३० (२१८), नांदगाव खंडेश्वर ः ६५,२०६ (३३८), चांदूररेल्वे ः ३९,९७६ (२१७), तिवसा ः ३८,२७१ (४९४),मोर्शी ः ५७,५९३ ( ११३६), वरुड ः ४३,४०९ (२०८२), दर्यापूर ः ७२०६४ (५३५), अंजनगावसुर्जी ः ४१,५२५ ( १७७७), अचलपूर ः ३८,६२५ (९६२), चांदूरबाजार ः ४१,४२५ ( ६७२), धामणगावरेल्वे ः ५६०४० (वाढ ७७०).

पीकनिहाय पेरणी हेक्टर क्षेत्र

कापूस २,४०,२६० (वाढ ३,६१३)

मका ४३,१०९ ( वाढ १७,६७४)

सोयाबीन २,४५,०९३ (घट १९,७४७)

तूर १,१७,१८६ ( घट ८१०)

मूग ७६३ ( घट ३१९)

उडीद ५५९ ( १६९)

ज्वारी ४०५६ ( २,३८२)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com