Kharif Sowing : अहिल्यानगरला ६ लाख ७६ हजार हेक्टरवर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

Kharif Season : जुनच्या शेवटच्या आठवड्यापर्यत पेरण्या वेगात सुरू होत्या. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणीला अडथळे आले होते.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : जिल्ह्यात यंदा पावसाला लवकर सुरुवात झाली. मे महिन्यात झालेल्या पावसाने मशागती लवकर उरकल्यामुळे पेरण्यालाही लवकर सुरुवात झाली. मात्र मध्यंतरी पावसाच्या उसंतीने पेरण्याला अडथळे आले होते. यंदा आतापर्यंत खरिपाची ६ लाख ७६ हजार ६९४ हेक्टरवर (९२.०२ टक्के) पेरणी झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा कापुस, बाजरी, सोयाबीनची कमी पेरणी झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचे ७ लाख १६ हजार २०९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यंदा तब्बल मे मधील पावसाची २२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जून महिन्यातही मृग जोरदार बरसला. त्यामुळे पेरण्याला लवकर सुरवात झाली.

Kharif Sowing
Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

जुनच्या शेवटच्या आठवड्यापर्यत पेरण्या वेगात सुरू होत्या. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणीला अडथळे आले होते. पाऊस नसल्याने जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात पीक करपू लागल्याची स्थिती होती. आता दोन दिवसांपासून जोरदार नसला तरी हलका, रिमझिम पाऊस पडत असल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing: राज्यात खरीप पेरा अंतिम टप्प्यात

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार ६९४ हेक्टरवर (९२.०२ टक्के) पेरणी झाली आहे. पाऊस सुरवातीला आला तर मुग, उडीद आणि तुरीचे क्षेत्र वाढते हे ठरलेले असते. यंदा मात्र हे क्षेत्रही फारसे वाढलेले दिसत नाही.

उडदाची ६७ हजार ७९४ हेक्टरवर, मुगाची ४८ हजार ०१९ हेक्टरवर पेऱणी झाली आहे. तुरीची पेरणी सरासरीच्या १०४.५१टक्के झाली आहे. कापसाची लागवडही सरासरीच्या ८९.११ टक्के झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा कापूस, बाजरी, सोयाबीनची कमी पेरणी झाली आहे.

पेरणी (हेक्टर) कंसात सरासरी क्षेत्र

भात १० हजार १५५ (१८७४५)

बाजरी ५८ हजार २७४ (८९,६२९)

मका १ लाख ९९ (७७,९९९)

तूर ६७ हजार ६२५ (६४ हजार ५८५)

मूग ४८ हजार ०१९ (५१ हजार ९८०)

उडीद ६७ हजार ४९४ (६७ हजार ५९५)

भुईमुग ४ हजार ५४७ (६ हजार ६००)

सोयाबिन १ लाख ७४ हजार ७२१ (१ लाख ७८ हजार ५०६)

कापूस १ लाख ३८ हजार ४११ (१ लाख ५५ हजार ३२९)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com