Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Stock : पुणे जिल्ह्यातील धरणांत अवघा २७ टक्के पाणीसाठा

Water Shortage : उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने धरणांतील पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून मार्च महिन्याच्या अखेरीस दहा धरणे कोरडी पडली आहेत.

Team Agrowon

Pune News : उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने धरणांतील पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून मार्च महिन्याच्या अखेरीस दहा धरणे कोरडी पडली आहेत. सध्या धरणांत अवघा २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात लहान मोठी एकूण २६ धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या महिन्यापासून अति उष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती.

त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत अवघा ५४.५२ टीएमसी म्हणजेच २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात या धरणांत एकूण ९१.२५ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याचे दिसून येते. तर टेमघर, कासारसाई, वडिवळे, शेटफळ, नाझरे, चिल्हेवाडी, माणिकडोह, येडगाव, विसापूर, उजनी, वडज ही धरणे कोरडी पडली असून यामध्ये मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नाझरे धरणांत मृत साठाही संपुष्टात आला आहे.

उन्हाळी हंगामामुळे शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. यामुळे खडकवासला, चासकमान, वीर, पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, घोड या धरणांतून डाव्या आणि उजव्या अशा कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.

सध्या मुठा खोऱ्यातील चार धरणांत अवघा १२.७४ टीएमसी म्हणजेच ४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये १७.६७ टीएमसी म्हणजेच ३६ टक्के पाणीसाठा आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांमध्ये ९.७९ टीएमसी म्हणजेच २० टक्के पाणीसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT