Water Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : लघू सिंचन प्रकल्पांत २५ टक्केच पाणीसाठा

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील २२ लघू सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी १०.३९८ दलघमी म्हणजेच २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तीन तलावांमध्ये १०० टक्के साठा जमा झाला आहे. मात्र ३ तलावांत पाणीसाठा अद्याप जोत्याखाली आहे.

जायकवाडी पाटबंधारे विभागाने गुरुवारी (ता. १) घेतलेल्या नोंदीवरून हे स्पष्ट झाले. गतवर्षीच्या १० टक्केच्या तुलनेत यंदा लघू तलावांमध्ये सरासरी १५ टक्के जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात आजवर पाणलोटात जोरदार पाऊस झालेल्या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील २२ पैकी १९ तलावांमध्ये सरासरी १०.३९८ दलघमी (२५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.तांदुळवाडी (ता. पालम), कोद्री (ता. गंगाखेड), बेलखेडा (ता. जिंतूर) हे ३ लघू तलाव १०० टक्के भरले आहेत.

गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव तलावामध्ये २१ टक्के, टाकळगाव तलावात प्रत्येकी १९ टक्के, पिंपळदरी तलावात २१ टक्के, जिंतूर तालुक्यातील देवगाव तलावात २ टक्के, जोगवाडा तलावात ५१ टक्के, वडाळी तलावात २२ टक्के, चारठाणा तलावात ५ टक्के, चिंचोली तलावात १६ टक्के, आडगाव तलावात १७ टक्के, केहाळ २० टक्के, भोसी तलावात ५८ टक्के, कवड ३ टक्के, मांडवी ३० टक्के, दहेगाव ३ टक्के, पाडाळी ४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मध्यम प्रकल्पात सरासरी ४८ टक्के साठा

करपरा व मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये गुरुवार (ता. १)पर्यंत सरासरी २५.०३ दलघमी (४८ टक्के) साठा उपलब्ध झाला आहे. त्यात करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पात १५.०८५ दलघमी (६१ टक्के), मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये ९.४४५ दलघमी (३७ टक्के) पाणीसाठा आहे. २०२३ मध्ये १ ऑगस्ट रोजी करपरा मध्यम प्रकल्पात २१ टक्के, तर मासोळी प्रकल्पात १८ टक्के दोन प्रकल्पांत १८ टक्के पाणीसाठा होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Factory Repayment : साखर कारखान्यांवरील थकहमी परतफेडीसाठी लागणार साधे बंधपत्र

Agriculture Department : दहा ‘एसएओं’ना सहसंचालकपदी पदोन्नती

Moong Rate : हिंगोली बाजार समितीत मूग १०,००० ते १३,०५० रुपये दर

Rain Update : बावड्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद

Agricultural Issue Protest : पीकविमा, मदतीच्या मुद्यावर तुपकर यांचा ‘ठिय्या’

SCROLL FOR NEXT