Water Project : ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओसंडून वाहतोय

Dhale Pimpalgaon Water Project : बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव धरणक्षेत्र परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओसंडून वाहता झाला.
Dhale Pimpalgaon Water Project
Dhale Pimpalgaon Water Project Agrowon
Published on
Updated on

Solapur News : बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव धरणक्षेत्र परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओसंडून वाहता झाला. या प्रकल्पातील पाण्यामुळे आता ढाळे पिंपळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्‍न मिटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

मागच्या महिन्यात जुलै आणि त्याआधी जूनमध्ये झालेल्या पावसामुळे ममदापूर, पाथरी, गोरमाळे येथील पाझर तलाव ओसंडून वाहू लागले होते, परिणामी, ढाळे पिंपळगाव प्रकल्प नव्वद टक्के भरला होता. पण गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने नीलकंठा व भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Dhale Pimpalgaon Water Project
Water Projects : खानदेशात अनेक प्रकल्पांत जलसाठा कमीच

प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रब्बी पिकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने प्रकल्प पूर्णपणे कोरडा ठाक पडला होता. परिणामी, ऊस, द्राक्ष व इतर फळबागा पिकांच्या क्षेत्रात घट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नदेखील गंभीर झाला होता.

पण आता वरुणराजाच्या कृपेने जुलै महिन्याच्या अखेरीस ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओसंडून वाहू लागला. धरण क्षेत्र परिसरातील ढाळे पिंपळगाव, मळेगाव, साकत, महागाव, बावी, तांदुळवाडी, चिखर्डे, काळेगाव, घाणेगाव येथील शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. भोगावती, राम नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हिंगणी मध्यम प्रकल्पही जवळपास सत्तर टक्के भरला आहे.

Dhale Pimpalgaon Water Project
Dam Water Project : ‘भंडारदरा’, ‘मुळा’मध्ये अडीच टीएमसी पाणी जमा
ढाळे पिंपळगाव प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरला आहे. प्रकल्प शंभर टक्के भरल्याने रब्बीच्या आशा देखील पल्लवित झाल्या आहेत. तसेच ऊस, द्राक्ष व इतर फळबागांच्या क्षेत्रात वाढ होण्यास पोषक वातावरण व स्थिती निर्माण झाली आहे.
अशोक आगलावे, ऊस उत्पादक शेतकरी बावी (आ), ता. बार्शी
राज्यात सन २०२३ मध्ये भीषण दुष्काळ पडल्याने प्रकल्प पूर्णपणे कोरडा ठाक पडला होता. जून व जुलै महिन्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे प्रकल्प ओसंडून वाहता झाला. प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे वर्षभराचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे.
दत्तात्रय कोळी, शेतकरी पिंपळगाव (पा), ता. बार्शी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com