Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : परतुरात २५ टक्केच रब्बी पेरणी; कमी पावसाचा परिणाम

Rabi Season : मागील वर्षी ३१ हजार ९९४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. परंतु, यावर्षी फक्त ३ हजार ६१९ हेक्टरवर ज्वारी आणि हरभरा या दोनच पिकांची पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Jalna News : यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे तालुका परिसरात रब्बीची पेरणी घटली आहे. मागील वर्षी ३१ हजार ९९४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. परंतु, यावर्षी फक्त ३ हजार ६१९ हेक्टरवर ज्वारी आणि हरभरा या दोनच पिकांची पेरणी झाली आहे.

परतुर तालुक्यामध्ये यावर्षी खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच अत्यल्प पाऊस झाला. तर खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला अत्यल्प उतारा आला.

शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. कपाशीची लागवड यावर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर झाली होती. पाण्याची उपलब्धता असलेल्या बागायती क्षेत्रावर कापूस चांगल्या प्रमाणावर फुटला आहे. मात्र, जिरायती क्षेत्रावरील कापूस पहिल्या वेचणीतच संपणार आहे.

परतीचा पाऊस देखील पडला नसल्याने यावर्षी निम्न दुधना प्रकल्पात २५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी असलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी तालुक्यात आजपर्यंत ३ हजार ६१९ हेक्टरवर शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली असून, यामध्ये ज्वारी आणि हरभरा या दोन पिकांचा समावेश आहे.यंदा पाऊस कमी असल्याने 50 टक्केच्या आत रब्बी पिकांची पेरणी होईल, असा अंदाज कृषि विभाग व्यक्त करत आहे.

ऊस उपलब्धतेची समस्या

यावर्षी विंधन विहिरीला पाणीसाठा अत्यल्प आहे. शिवाय निम्न दुधना धरणात केवळ २५ टक्केच पाणीसाठा असल्याने नविन उसाची लागवड यावर्षी होणार नाही. असलेला ऊस यंदा कमी होणार असल्याचे चित्र आहे. पुढील वर्षी साखर कारखानदारांसमोर ऊस उपलब्धतेची समस्या राहण्याची शक्यता आहे.

पेरणी झालेले क्षेत्र

रब्बी ज्वारी २३०० हेक्टर

रब्बी हरभरा १३१९ हेक्टर

मागील वर्षी झालेली पेरणी

(हेक्टरमध्ये)

ज्वारी १०४५४

हरभरा १३४३०

तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरिपातील पिकांचे देखील मोठे नुकसान झालेले आहे. रब्बीची पेरणीही कमीच झालेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्याने पेरणी होईल. ज्वारी, गहू, हरभरा, सूर्यफूल आदी पिकांची मागील वर्षी चागल्या प्रमाणात लागवड झाली होती. यावर्षी फार कमी ज्वारी आणि हरभरा या दोनच पिकांची लागवड झाली आहे.
- आकाश माने, तालूका कृषी अधिकारी, परतूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT