Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune water scarcity : पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! धरणांमध्ये फक्त २३ टक्केच पाणीसाठा

Crisis of water scarcity : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त २३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट घोंगावत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या वर्षी राज्यात पाऊस कमी झाल्याचा फटका यंदा अनेक जिल्ह्यांना बसत आहे. विविध जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणीकपात केली जात आहे. असेच संकट आता पुणेकरांवर घोंगावत असून पुणे शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या धरणांमध्ये केवळ २३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर हे पाणी १५ जुलैपर्यंत वापरावे लागणार आहे. यादरम्यान शेतीचे आवर्तन व बाष्पीभवनामुळे पाण्यात घट होणार असल्याने पुणेकरांवर पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या अशी स्थिती नसून तूर्तास पाणीकपात होणार नाही असा दावा महापालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

यादरम्यान लोकसभा मतदारसंघातील मतदानावरून सध्यातरी पाणीकपातीचा कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता. पण आता मतदान पार पडले असून आता लवकरच कालवा समितीची बैठक होणार आहे. तसेच पुणे शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या खडकवासला धरणाच्या साखळीत ६.७२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. जो गतवर्षी याच दिवशी ९.१७ टीएमसी होता. पण आता शेतीसाठी लागणारे पाणी आणि वाढत्या उन्हामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे पुण्यात पाणीकपात अटळ मानली जात आहे.

पुण्याला खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव, भामा आसखेड, पवना या सहा धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. तर सर्वाधिक पाणी हे खडकवासला धरण साखळीतून ओढले जाते.यावरच शहरातील भाग अवलंबून आहे. पण गेल्यावर्षी कमी पडलेल्या पावसामुळे धरण भरलेच नाही. यामुळे १५ जुलैपर्यंत पाण्याच्या काटेकोर वापरावर सध्या नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

शहराला दरमहा पिण्यासाठी १.५८ टीएमसी पाणी लागते. तर शेतीसाठी खडकवासला धरणातून आवर्तन द्यावे लागते. सध्या खडकवासला धरणसाखळीत ६.७२ टीएमसी पाणीसाठा असून यातील तीन टीएमसी पाणी १५ जुलैपर्यंत काटकसरीने वापरावे लागणार आहे. तर ३.७२ टीएमसी पाणीसाठ्यातून शेतीसाठी आवर्तन द्यावे लागणार आहे. यामुळे कपात करावी लागेल असा दावा केला जात आहे.

तूर्तास पाणीकपातीचा निर्णय करण्यात आला नसून तसा निर्णय घ्यावा लागलाच तर कोणत्या दिवशी कोणता वार्ड पाणीकपात असेल याचे नियोजन मनपा प्रशासनाने तयार केल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे. तसेच आयुक्त भोसले यांनी सध्याच्या पाणीटंचाईचा आणि खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. सध्या पाणीटंचाई असलेल्या भागात १४०० टँकरद्वारे पाणी पुरवले जात असून पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असेही आयुक्त भोसले यांनी सांगितले आहे.

कालवा समिती बैठक

पाणीपुरवठ्याबाबतचे निर्णय जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा समितीच्या बैठकीत घेतले जातात. पुण्याच्या बाबतही याच समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. सध्या आचारसंहिता लागू असल्याने समितीची बैठक झालेली नाही. तर येत्या पंधरा दिवसानंतरच लोकसभा निवडणुकींचा निकाल लागणार असल्याने आचारसंहिता देखील संपेल. यानंतर पालकमंत्री अजित पवार तातडीने कालवा समितीची बैठक घेतील आणि पाणीकपातीबाबत निर्णय होईल असेही बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT