Land Records Agrowon
ॲग्रो विशेष

Land Records : भूमी अभिलेख अपिलाच्या सुनावणीसाठी ऑनलाइन सुविधा ; भूमिअभिलेखामध्ये ‘प्रत्यय’ प्रणाली सुरू; निकाल ऑनलाइन मिळणार

Land Record Online : भूमिअभिलेख विभागातील अपिलांच्या सुनावणीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ‘प्रत्यय’ ही प्रणाली राज्यात लागू करण्यात आली आहे.

Team Agrowon

संदिप नवले

अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पुणे : भूमिअभिलेख विभागातील अपिलांच्या सुनावणीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ‘प्रत्यय’ ही प्रणाली राज्यात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार भूमिअभिलेख विभागातील तालुक्यातील उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक ते विभागीय स्तरावरील उपसंचालक, अप्पर मुख्य सचिव (अपील), या अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन पद्धतीने अपील दाखल करता येणार आहे.

अपील, अर्ज दाखल केल्यानंतरची सद्यःस्थिती, नोटीस, सुनावणीची तारीख आणि निकाल सुद्धा नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांचा मोठा वेळ वाचणार आहे. राज्यात ऑनलाइन सुविधा देण्यामध्ये अग्रेसर असलेल्या भूमिअभिलेख विभागाने त्यामध्ये आणखी एका सुविधेची भर घातली आहे. प्रत्यय या प्रणालीचा प्रारंभ नुकताच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आला. या वेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव संतोष कुमार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, उपसंचालक राजेंद्र गोळे उपस्थित होते.

भूमिअभिलेखने १०० दिवसांमध्ये जे उद्दिष्ट दिले होते ते वेळेत पूर्ण केले. याबद्दल जमाबंदी आयुक्त डॉ. दिवसे आणि अधिकाऱ्यांचे बावनकुळे यांनी अभिनंदन केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की भूमिअभिलेख विभागाचा कारभार पेपरलेस होण्यासाठी ही प्रणाली उपयोगी ठरणार आहे. तालुका ते जिल्हा, जिल्हा ते विभागीय आणि विभागीय ते शासन स्तर या सर्व टप्प्यांसाठी अर्ज दाखल करणे शक्य झाले आहे. पुढील टप्प्यात सुनावणीसाठी ऑनलाइन उपस्थित राहण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे. ११ हजार अपील प्रलंबित आहेत. काही अपिले ही २०१२ पासूनची आहेत. ही अपिले लवकर निकाली काढण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘प्रत्यय’ प्रणालीची वैशिष्ट्ये

- नागरिकांना फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलोकन अर्ज ऑनलाइन दाखल करता येणार.

- अर्ज, अपील यांची सद्यःस्थिती, सुनावणीचा दिनांक व वेळ, विरुद्ध पक्षाचे म्हणणे सर्व काही ऑनलाइन पाहता येणार.

- दिवाणी न्यायालयाप्रमाणे पुढील टप्प्यात ऑनलाइन सुनावणीची सुविधासुद्धा उपलब्ध केली जाणार.

- घरबसल्या अपीलदार, जबाबदार आणि वकील आपले म्हणणे मांडून वेळ, श्रम आणि पैसा वाचवू शकतील.

- पारदर्शक प्रक्रिया आणि वेळेची बचत करून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tipeshwar Wildlife Sanctuary : टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

Seaweed: पीक पोषणासाठी समुद्री शेवाळ अर्क

Krishi Seva Kendra Bbhandara : भंडारा जिल्ह्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Sugarcane Pest Management: उसावरील पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन

Indian Politics: उपराष्ट्रपतिपदासाठी सरकारची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT