Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसाने कांदा, गहू, ज्वारी पिकांसह वीटभट्टीवाल्याचे मोठे नुकसान

वीटभट्टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्चा विटा पावसात भिजून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Pune News : तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी (ता. ६) सायंकाळी व रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नव्याने लागवड केलेला कांदा व काढणी (Onion harvesting) केलेल्या कांद्याचे, तसेच काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान (Wheat Loss) झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

तसेच मोहोर गळाल्याने आंब्याचेही नुकसान होणार आहे. वीटभट्टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्चा विटा पावसात भिजून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

धामणी, जारकरवाडी, वैदवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, पारगाव, खडकवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, देवगाव, काठापूर बुद्रुक परिसरात सोमवारी (ता.६) सायंकाळी व रात्री विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही गावांत गाराही पडल्या.

या पावसाने काढणीला आलेल्या ज्वारी, तसेच गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या वर्षी कांद्याला बाजारभाव नाही, त्यातच काही ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला.

अचानक आलेल्या पावसाने कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. तसेच शेतात असलेल्या कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे, अशी माहिती टाव्हरेवाडीचे सरपंच व आंबेगाव तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष उत्तम टाव्हरे यांनी दिली.

सोमवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांची धांदल उडाली काहींनी प्लॅस्टिक कागदाने कच्चा विटा झाकण्याचा प्रयत्न केला, तरीही काही प्रमाणात मातीच्या कच्चा विटा पावसात भिजून फुटून गेल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती वैदवाडी येथील वीटभट्टी व्यावसायिक ज्ञानेश्‍वर दरेकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT