Onion Producer Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Producer Farmer : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार गावित यांच्यासमोर मांडल्या व्यथा

Onion Crop : साक्री तालुक्यात दिघावेसह परिसरातील सोळा गाव काटवन परिसरातील अवकाळी पावसाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या कांदा पिकाचा सरसकट पंचनामा करावा.

Team Agrowon

Dhule News : साक्री तालुक्यात दिघावेसह परिसरातील सोळा गाव काटवन परिसरातील अवकाळी पावसाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या कांदा पिकाचा सरसकट पंचनामा (Onion Crop Damage Survey) करावा, अशा सूचना आमदार मंजुळा गावित (MLA Manjula Gavit) यांनी महसूल आणि कृषी विभागास दिल्या. अतिपावसात दिघावे परिसरात कांदापीक पाण्यात सापडले आहे.

आमदार मंजुळा गावित, तहसीलदार आशा गांगुर्डे, नायब तहसीलदार राहुल मोरे, तलाठी मनीषा अहिरे, कृषी सहाय्यक हेमंत अकलाडे, सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच नामदेव टकले यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

अवकाळी पावसाच्या तडाख्यात काढलेला तसेच जमिनीत असलेला कांदादेखील सडण्याच्या मार्गावर असल्याची वेदना शेतकऱ्यांनी आमदार गावित, तहसीलदार आशा गांगुर्डे यांच्यापुढे मांडली.

भविष्यात शेती पिकाविषयी शाश्वती नसल्याची रड शेतकरी काशिनाथ सावंत, पंकज सावंत, राजेंद्र शेवाळे, राकेश भामरे, सागर दशपुते, शुभम देवरे आदींनी मांडली.

‌‌ताई, शेतातच जाऊ नये का..!

वर्षभर कष्टाची पराकाष्ठा करत कांदापीक हाती येणार होते. काढणीवर आलेलेच काय जमिनीत उभे असलेले कांदापीकदेखील सडण्याच्या मार्गावर आहे. मग ताई, अशा वेळी आम्ही शेतातच जाऊ नये का, असा आर्त सवाल शेतकऱ्यांनी आमदार व तहसीलदारांपुढे उपस्थित केला.

दुसरीकडे कवडीमोल कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा अवकाळी पावसाने संपूर्ण उन्हाळाभर शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे केले आहेत.

दरवाढीच्या अपेक्षेने कांदालागवड वाढत असल्याचे चित्र असताना सरकार आणि निसर्ग मात्र शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा पाहत असल्याचा खडा सवाल शेतकऱ्यांनी आमदारांपुढे मांडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Heavy Rain: मुसळधार पावसाने झोडपले; धरणांतून विसर्ग

Legislature Adjourned: विधिमंडळाचे कामकाज काही मिनिटांतच तहकूब

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

Maharashtra Agriculture Sowing: राज्यात ३९ टक्के पेरण्या पूर्ण

Monsoon Disaster: बारा जणांचे मृत्यू सुलतानी कारभारामुळे; काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT