Onion Rate agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : सोलापुरात कांदा दरात पुन्हा सुधारणा

Onion Market Update : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक कमीच राहिली. पण मागणी असल्याने कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा झाली.

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक कमीच राहिली. पण मागणी असल्याने कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज ५० ते १०० गाड्यांपर्यंत राहिली. एरव्ही या आवकेच्या दुप्पट आवक बाजारात होते, परंतु या सप्ताहात त्यात काहीशी घट झाली. पण मागणी असल्याने दर मात्र वाढले. कांद्याची आवक जिल्ह्याबाहेरून सर्वाधिक झाली. जिल्ह्यातील आवक तुलनेने कमीच राहिली.

कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, टोमॅटो, बटाट्याचे दरही काहीसे वाढले. त्यांची आवक तशी चांगली राहिली. वांग्याची रोज १० ते २० क्विंटल आणि टोमॅटो, बटाट्याची आवक ३०० ते ५०० क्विंटलपर्यंत राहिली.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आवकेतही सातत्याने चढ-उतार सुरु आहे. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान १००- रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, टोमॅटोला किमान ३०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये तर बटाट्याला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३३०० रुपये असा दर मिळाला.

या सप्ताहात डाळिंबाच्या दरात किरकोळ चढ-उतार वगळता डाळिंबाला चांगला दर मिळाला. डाळिंबाची आवक सांगोला, मंगळवेढा, माढा या स्थानिक भागातून झाली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ४५०० रुपये आणि सर्वाधिक १५ हजार रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT