Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market Rate : विंचूरचा कांदा हैदराबाद बाजार समितीत नेणार

Onion Bajarbhav : विंचूर उपबाजार समितीमध्ये कांद्याला दर कमी मिळत असल्याने दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले होते.

Team Agrowon

Vinchur News : विंचूर उपबाजार समितीमध्ये कांद्याला दर कमी मिळत असल्याने दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले होते.

शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यात कांद्याला दोन हजार रुपये दर कसा मिळतो आणि आपल्याकडे का मिळत नाहीत, असा संताप व्यक्त केला. याची दखल घेत भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्रातील समन्वयक माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट विंचूर गाठत उपबाजार समितीला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.

कांद्याचे लिलाव पाहून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विंचूर येथील कांदा तेलंगणा राज्यातील हैदराबाद बाजार समितीत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था पुढील आठवड्यापासून केली जाणार असल्याचे जाहीर करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.

छत्रपती संभाजीनगर येथून शेतकऱ्यांचा कांदा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे पाठवला असता १९०० ते २००० रुपये इतका बाजार भाव मिळाल्याचे शेतकरी सांगत आहेत. कांद्याला चांगला भाव मिळत आहे, त्यामुळे येथील राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे ही भूमिका होती.

पण सरकार काही करत नसल्याने येथे कांद्याला बाजारभाव नाही असे भारत राष्ट्र समिती पक्षाचे महाराष्ट्रातील समन्वयक हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.

वाहतूक आणि मजुरी निघत नसल्याची खंत

विंचूर बाजार समिती कांद्याच्या लिलावत ९०० ते १००० रुपये प्रति क्विंटलने कांद्याची विक्री होते. हाच कांदा तेलंगणामध्ये २ हजार रुपयांत विक्री होतो. कन्नडच्या शेतकऱ्यांना हा भाव मिळतो, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

कांद्याला ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च येत असून मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्च तर सोडा वाहतूक आणि मजुरी निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त करत तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्र राज्य किंवा केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा, अशी मागणी करण्यात आली. ललित दरेकर, नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT