Onion Bajarbhav Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Bajarbhav : शेतकरी संघटनेचे कांदा होळी आंदोलन

सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे आज कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचा आरोप यावेळी अविनाश नाकट यांनी केला.

Team Agrowon

Akola News : कांद्याला दर मिळत नसल्याने राज्यातील उत्पादक कमालीचा अडचणीत आलेला आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे दर (Onion Rate) पडले असून मातीमोल भावाने शेतकऱ्यांना आपला माल विकण्याशिवाय पर्याय आलेला नाही. याचा निषेध करण्यासाठी होळीच्या दिवशी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector's Office) कांद्याची होळी करत निषेध नोंदवला.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी शेतकरी संघटनेचे अविनाश नाकट, विलास ताथोड, बळीराम पांडव, यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी चार पोते कांदयाची  होळी पेटवण्यात आली.

सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे आज कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचा आरोप यावेळी अविनाश नाकट यांनी केला. तर सरकारने तातडीने आपल्या धोरणात बदल करून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल, असे धोरण घेण्याची मागणी विलास ताथोड यांनी केली.

सरकारने तातडीने शेतकऱ्यांचा कांदा योग्य त्या भावाने खरेदी करावा अशी आवाहन यावेळी पांडव यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी

Maharashtra Heavy Rainfall: अतिवृष्टीचा ३० जिल्ह्यांना फटका

Sanyukt Kisan Morcha: शेतकरी आत्महत्या हे संघटनांचे अपयश

e-POS Fertilizer Sales: ई-पॉस प्रणालीद्वारे खतांची विक्री करणे बंधनकारक

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार

SCROLL FOR NEXT