Onion Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Harvesting : कांदा काढणीचा दर एकरी १२ हजार रुपयांवर

Onion Rate : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कांद्याच्या काढणीला वेग आला आहे. कांदा काढणीसाठी इतर जिल्ह्यांतील मजूर कांदा उत्पादकांच्या शेतात दाखल झाले आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कांद्याच्या काढणीला वेग आला आहे. कांदा काढणीसाठी इतर जिल्ह्यांतील मजूर कांदा उत्पादकांच्या शेतात दाखल झाले आहेत. हे मजूर प्रतिएकर १२ हजार रुपये याप्रमाणे कांदा पीक काढणीची मजुरी घेत आहेत. स्थानिक मजूर, शेजारच्या गावांमधील मजुरांनाही मागणी वाढली आहे. सध्या मजुरांना ३०० रुपये मजुरी, तर १०० रुपये गाडीभाडे अशा पद्धतीने साडेचारशे रुपये मजुरी मिळत आहे.

गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा काढणीला वेग आला आहे. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला.

त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी कांदा काढणी व काढून झालेला कांदा बराकीत साठविसाठी धावपळ करीत आहेत. परंतु, या कांदा काढणीवर अवकाळी पावसाचे सावट आहे. तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे कांदा उत्पादक चिंतेत पडला आहे.

जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, दौंड, बारामती, पुरंदर, इंदापूर हे तालुके कांदा उत्पादनात अग्रेसर मानले जातात. तालुक्यातील पूर्व भागात कांद्याची लागवड केली आहे. परंतु, पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे इंदापूर, बारामती भागात कांदा लागवड काहीशी घटली आहे. मात्र, लागवड केलेल्या कांद्याची काढणी सुरू झाली आहे.

कांदा काढणीला वेग आला आहे. उन्हाची तीव्रता मोठी असतानाही कांदे काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. कांद्याची पात उन्हामुळे वाळून गेल्याने सर्वच शेतकरी कांदा काढणीसाठी धावपळ करत आहेत. परिणामी, कांदा काढणीसाठी मजुरांना मागणी जास्त तर मजुरांची संख्या कमी यामुळे कांदा काढणी करताना मजूर टंचाई भेडसावत आहे.

एकरी बारा हजार...

मजूर अकरा वाजता शेतात येतात. सायंकाळी पाच वाजले की मजुरांची सुट्टी होत असते. अनेक शेतकरी प्रतिएकरी १० ते १२ हजार रुपये दर कांदा काढणीसाठी देतात. कांदा काढणीसाठी पुरेसे मजूर मिळत नसल्याने मजुरांना जादा देऊन कांदा काढणी करावी लागत आहे.

तसेच काढून झालेला कांदा बराकीत साचून ठेवण्यात येत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी आल्या होत्या. यामुळे कांदा उत्पादकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा तीन एकरांवर रब्बी कांद्याची डिसेंबर, जानेवारीमध्ये लागवड केली होती. जवळपास चार महिन्यांनी कांदा काढणीला आहे. सध्या आमच्याकडे अवकाळी पाऊस नसला तरी अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. त्यामुळे सध्या कांदा काढणीसाठी ११ ते १२ हजार रुपये दर चालू आहे. आगामी काळात कांद्याला चांगला दर मिळल्यास काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होईल.
- विकास चोरमले, प्रगतिशील शेतकरी, वाळकी, ता. दौंड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Home Industry: नाचणी, भाजीपाल्याच्या पापडांची चव न्यारी

Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’

Weekly Weather: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Eknath Shinde: दरडीप्रवण भागातील कुटुंबांचे पुनर्वसन करणार : एकनाथ शिंदे

Sugarcane Workers Welfare: ऊसतोड मजुरांच्या आरोग्य समस्येवर ‘साथी’चा इलाज

SCROLL FOR NEXT