Onion Labor Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Labor Shortage: कांदा काढणीची भिस्त परप्रांतीय मजुरांवर

Dependent on Migrant Workers: नाशिकमध्ये कांदा काढणीचे काम यंदा अधिक अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना परप्रांतीय मजुरांवर अवलंबून राहावे लागत आहे, कारण स्थानिक मजुरांची टंचाई आणि खर्चात वाढ झाली आहे.

मुकुंद पिंगळे

Nashik News: समाधानकारक पाऊस व रब्बी उन्हाळ कांद्याला दर असल्याने यंदा शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे ओढा होता. मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांद्याची रोपे बाधित झाली. तरीही शेतकऱ्यांनी दुबार रोपवाटिका तयार करून कांदा लागवडी वाढविल्याने यंदाचे वर्ष विक्रमी लागवडीचे आहे.

हा कांदा काढण्यासाठी येत आहे; मात्र मजूरटंचाईचा सामना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. काढणी खर्चात ३० ते ४० टक्के वाढ, त्यातच वेळेवर स्थानिक मजूर उपलब्ध होत नाहीत, यामुळे यंदा परप्रांतीय मजुरांवरच कांदा काढण्याची भिस्त आहे.

शेतीच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर शेतमजुरांची टंचाई जाणवत आहे. एकीकडे मजुरी दरात वाढ झाली. त्यात अधिकचे पैसे मोजूनही कामे वेळेत होत नसल्याने कांदा काढण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे.

या पार्श्‍वभूमीवर मध्य प्रदेश व गुजरात येथील मजूर कुटुंबासह जिल्ह्याच्या विविध भागांत आले आहेत. स्थानिक मजुरांच्या तुलनेत मजुरी दर कमी असतात. मात्र यंदा त्यांचाही भाव वाढला आहे. एकरी १२ ते १६ हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. त्यात कांद्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.

परप्रांतीय मजूर शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर उपलब्ध होतात. ८ ते १० तास कामाची त्यांची क्षमता असते. मात्र या मजुरांना घेऊन यावे लागते. याशिवाय निवारा, पाणी, तर कधी जेवणाची सोय करावी लागते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दमछाक होत असल्याने शेतकरी या कामामुळे वैतागून गेले आहेत.

मध्य प्रदेशातील टोळी कांदा काढण्यासाठी आणली होती, मात्र ती मजुरांची टोळी निघून गेली. आता पुन्हा गुजरातची टोळी शोधून कामकाज सुरू आहे. एकाच हंगामात आज इथले तर उद्या दुसरीकडचे मजूर अशी कांदा काढण्याची गंभीर परिस्थिती आहे.
पंडित वाघ, शेतकरी, बार्डे, ता. कळवण, जि. नाशिक
मजुरांची ने–आण करण्यासह त्यांना कामाच्या आगाऊ रकमा द्याव्या लागत आहेत. ज्यांच्याकडे ओळख, त्यांच्याकडे प्राधान्याने हे मजूर काम करतात. एवढी अडचण गेल्या अनेक वर्षांत झालेली नव्हती.
संदीप कोकाटे, शेतकरी, साताळी, ता. येवला
महाराष्ट्रात मजुरांची काळजी घेतली जाते. कामाचे पैसे शेतकऱ्यांकडून वेळेत दिले जात असल्याने इकडे येत असतो. यंदा मात्र कांदा काढण्याचे कामे अधिक आहेत. यासह ऊन वाढल्याने अडचणीच्या काळातही कांदा काढणी सुरू आहे. मात्र काही मजूर गावाकडे परतत आहेत.
रविदास सोलंकी, शेतमजूर, सेंधवा, जि. बडवाणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Mill Closure: पुढील वर्षी निम्मे कारखाने बंद राहणार

Chia Seed Price: वाशीममध्ये चियासीड दर १३००० ते १५६०० रुपये

Energy Fertilizers Price: ऊर्जा, खतांच्या दरांत मोठी वाढ

Agriculture Export: शेतीमालाची ११८० कोटी डाॅलर्सची निर्यात धोक्यात

Maharashtra Heatwave: अनेक ठिकाणी पारा ३८ अंशापार

SCROLL FOR NEXT