Global Politics: अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणारी प्रत्येक महत्त्वाची घटना भारताला पुन्हा पुन्हा सांगत आहे, की नेहरूवीयन मॉडेलकडे परत जा..येत्या २७ मे रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची ६२ वी पुण्यतिथी आहे. जवाहरलाल नेहरू काँग्रेस पक्षाचे नेते होते. पण पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची अनेक अर्थांनी केलेली पायाभरणी, एका व्यापक अर्थाने, पक्षनिरपेक्ष होती. देशाचे भविष्यातील हित केंद्रस्थानी ठेवून केली होती. नंतर देशात सत्तेवर आलेल्या पक्षांनी, पंतप्रधानांनी त्याच पायावर वरचे मजले उभारले आहेत..Simhastha Kumbh Mela: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण.गेल्या ६२ वर्षांत जगाचा भू-राजनैतिक, आर्थिक, व्यापारी, लष्करी पट न ओळखण्याएवढा बदलून गेला आहे. गेल्या काही वर्षांत तर त्या बदलाने वेग घेतला आहे. तरी देखील अशा वादळी काळात नेहरूवीयन मॉडेलची काही तत्त्वे मार्गदर्शक ठरू शकतात..परराष्ट्र नीती आणि देशाची आर्थिक नीती हे नेहरूवीयन मॉडेलचे दोन प्रमुख परस्परपूरक स्तंभ होते. कोणत्याही महासत्तेबरोबर आयडेंटिफाय न होता, कोणत्या एका भू-राजनैतिक वा लष्करी आंतरराष्ट्रीय गटात सामील न होता, त्याचवेळी कोणत्याच गटाबरोबर शत्रुभाव न बाळगता भारताने आपली परराष्ट्र नीती आखली पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. हे म्हणजे जगातील ताकदवान देशाना घाबरून दूर उभे राहणे नव्हते. तर आपली फरफट न होऊ देता आपल्या देशाच्या काय हिताचे आहे ते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवू शकू ही रणनीती होती. आणि हे फक्त मी माझे बघेन असे पण नव्हते. तर भारताने त्या काळात दुसऱ्या महायुद्धानंतर नुकत्याच स्वतंत्र झालेल्या आणि वसाहतवादी अनेक दशकांच्या शोषणामुळे पांढरे फटक पडलेल्या देशांना संघटित करून त्याचे नेतृत्व केले. यातूनच अलिप्ततावादी चळवळ (नॉन-अलाइन मूव्हमेंट) तयार झाली..नेहरूवीयन मॉडेलचा दुसरा स्तंभ होता देशांतर्गत आर्थिक धोरणांचा. यात प्रामुख्याने पायाभूत सुविधांची उभारणी, उच्च शिक्षण संस्था उभारून देशाला लागणारे शिक्षित मनुष्यबळ तयार करणे, देशात शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधनावर आधारित औद्योगिकीकरण, सरंक्षण, अणुसंशोधन / अंतराळ संशोधन, शेतीशी निगडित संशोधन, रासायनिक खतांचा वापर करून एकरी उत्पादन वाढवणे, सहकाराला पाठबळ, जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात सार्वजनिक मालकीचे उपक्रम अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवणे आदी मुद्यांचा समावेश होतो..Artemis II Mission: अर्धशतकानंतरची ऐतिहासिक चांद्रझेप पूर्ण.आज जगात भू-राजनैतिक, लष्करी, आर्थिक आघाड्यांवर काय चालले आहे, यावर नजर टाका आणि भारताला भविष्यात काय करायला लागणार आहे याचा विचार करा. अमेरिकेला धरले तर ती चावते आहे हे लक्षात येत आहे आणि चीन बरोबरचा ताणतणावांचा रक्तरंजित इतिहास आठवणीत असताना देखील चिनी गुंतवणुकीसाठी प्रचलित धोरणात बदल करणे भाग पडत आहे..ऊर्जा सुरक्षेसाठी कोणत्याच एका स्रोतांवर अवलंबून राहणे धोक्याचे आहे हे कळत आहे; त्यानुसार परराष्ट्र नीती आखावी लागणार आहे. खनिज इंधनाला पूरक जैविक वा तत्सम पर्यायी स्रोत असावे लागतील. त्यावर भरपूर नफा नाही मिळणार. म्हणून खासगी क्षेत्र त्यात उतरणार नाही..स्वयंपूर्णता (सेल्फ रिलायन्स) तत्त्वाची खिल्ली उडवली गेली. फक्त काही वर्षांपूर्वी हात पिरगाळून जागतिकिरणाचे डोस पाजणारी विकसित राष्ट्रे आता स्वतः आमचे आर्थिक हितसंबंध सर्वप्रथम म्हणत आहेत. याचा अर्थ आपण आपले / आपल्या जनतेचे आर्थिक हितसंबंध केंद्रस्थानी ठेवण्याचा अधिकार गाजवला पाहिजे. संरक्षण सिद्धता देशांतर्गत विकसित करण्यावर भर द्यावा लागेल. संरक्षणासाठी कोणत्या एका पुरवठादार राष्ट्रावर अवलंबून राहिले तर ते त्याचा गैरफायदा घेणार हे नक्की..आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक, हवाई वाहतूक अनिश्चित, असुरक्षित झाली आहे. खासगी भांडवलाला झेपणारी नाही. म्हणून सार्वजनिक मालकीच्या जहाज कंपन्या, बंदरे, विमान कंपन्या, विमानतळ सार्वजनिक मालकीचे असण्याचे महत्त्व आहे. अन्न सुरक्षा वाढवावी लागेल. सार्वजनिक पैशातून शेती संशोधनावर भर द्यावा लागेल. परकीय चलन वाचवावे लागेल. धान्य, डाळी, तेलबिया इत्यादींचे उत्पादन करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे राबवावी लागतील..विकसित राष्ट्रांचे हितसंबंध जपणाऱ्या जागतिक बँक / नाणेनिधीच्या नादी न लागता, निर्यात प्रधानतेवर नको तेवढा भर न देता, देशांतर्गत बाजारपेठ विकसित करण्यासाठी कोट्यवधी नागरिकांची क्रयशक्ती वाढवावी लागेल. बँकिंग / वित्त क्षेत्र वादळी परकीय भांडवलाच्या तडाख्यात सापडणार नाही, यासाठी बँका, विमा, पेन्शन कंपन्या, भांडवली बाजार, सार्वजनिक मालकी प्रभुत्वस्थानी असणारे ठेवावे लागतील..परकीय चलनाची गंगाजळी वाढवावी लागेल. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तिचा विनियोग कसा करायचा याचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. देशासाठी परकीय चलन कमावते कोण आणि खर्च कोण करते, याचा सारासार विचार करावा लागेल.(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.