Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : खानदेशात साडेसहा हजार हेक्टरवर कांदा लागवड पूर्ण

Onion Production : खानदेशात कांदा लागवड सुरूच आहे. लागवड आणखी आठवडाभर सुरू राहील. रोपांना मागणी असून, खानदेशात सुमारे साडेसहा हजार हेक्टरवर कांदा लागवड पूर्ण झाल्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव : खानदेशात कांदा लागवड सुरूच आहे. लागवड आणखी आठवडाभर सुरू राहील. रोपांना मागणी असून, खानदेशात सुमारे साडेसहा हजार हेक्टरवर कांदा लागवड पूर्ण झाल्याचा अंदाज आहे.

यंदा कांदा लागवड सात ते साडेसात हजार हेक्टरवर होईल, अशी स्थिती आहे. यंदा लागवड वाढेल किंवा स्थिर राहील, असा अंदाज सुरुवातीलाच होता. कारण पाऊसमान चांगले राहिल्याने सर्वच भागात जलसाठे मार्च-एप्रिलपर्यंत मुबलक राहतील. यामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये रोपवाटिका निर्मितीला वेग आला. लागवड मागील महिन्यात सुरू झाली. मागील वर्षी लागवड सुमारे सात हजार हेक्टरवर झाली होती. यंदा लागवड मात्र स्थिर राहील किंवा साडेसात हजार हेक्टरवर होईल, असा अंदाज आहे.

यंदा चांगला पाऊस खानदेशात झालेला आहे. त्यात कांदा रोपवाटिका निर्मितीसाठी कांदा बियाण्याची खरेदी शेतकरी ऑक्टोबरमध्ये करीत होते. बियाणे महाग होते. यामुळे काही शेतकऱ्यांकडून उत्पादित कांदा बियाण्यांची खरेदीदेखील करण्यात आली. लागवड डिसेंबरमध्ये सुरू झाली. लाल कांद्याची अधिक लागवड आहे. यंदा सुमारे साडेसात हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. कांद्याचे दर स्थिर आहेत.

खरिपातील काढणी झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल १५०० ते तीन हजार रुपये कमाल दर मिळाला आहे. अजूनही लेट कांद्याची आवक बाजारात होत आहे. सरासरी दर अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे. कांद्याचे एकरी १२० क्विंटलवर उत्पादन काही शेतकऱ्यांनी मागील हंगामात किंवा लेट खरिपात घेतले आहे. रोपवाटिकानिर्मिती काही जण व्यावसायिक स्वरूपात करतात. तर काही शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून लागवडीच्या नियोजनासंबंधी रोपवाटिका तयार केल्या.

व्यावसायिक रोपवाटिका चोपड्यातील अडावद, धानोरा, माचले, लासूर, मराठे आदी गावांसह यावलमधील साकळी, किनगाव, शिरसाड, चुंचाळे, आडगाव, डांभुर्णी, धरणगावमधील पथराड, चोरगाव, भुलपाटे, टहाकळी, दोनगाव, एरंडोलमधील खर्ची, रवंजे, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे आदी भागात होत्या. सुमारे १५० ते १८० हेक्टरवर या रोपवाटिका रब्बी किंवा उन्हाळ हंगामासाठी तयार केल्या. लागवडीस मागील महिन्यात चांगली गती होती. २५ ते २९ डिसेंबरदरम्यान झालेल्या पावसाने गती कमी झाली. परंतु या आठवड्यात लागवडीस गती आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT