Onion Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop : नगर जिल्ह्यात साडेपंधरा हजार हेक्टरवर कांदा पीक

Onion cultivation : यंदा नगर जिल्ह्यात खरिपात १५ हजार ६२६ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली, असे कृषी विभागाने जाहीर केले आहे.

Team Agrowon

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील खरीप पेरणीची अंतिम आकडेवारी कृषी विभागाने जाहीर केली आहे. यंदा नगर जिल्ह्यात खरिपात १५ हजार ६२६ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली, असे कृषी विभागाने जाहीर केले आहे. यंदा सुरुवातीपासून पुरेसा पाऊस नसला, तरी नगर जिल्ह्यात खरिपाची सरासरीच्या ११७ टक्के म्हणजे ६ लाख ८३ हजार ६५८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा जिल्ह्यातील सर्वच भागांत सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे पेरण्यालाही अडथळे निर्माण होत होते. त्यातही अल्प पावसावर अनेक भागांत पेरणी उरकली. त्यानंतर पावसाने दिलेल्या खंडाने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, ८० टक्के पिके वाया गेली आहेत. नगर जिल्ह्यात कांदा पिकांचे अधिक असते. मात्र कृषी विभागाकडे होत असलेल्या नोंदीत कांदा पिकांची फारशी दखल घेतली जात नाही. बहुतांश वेळा कृषी विभागाकडे कांदा लागवडीची माहितीच उपलब्ध नसते. आता नव्याने केलेल्या रब्बी पेरणी नियोजनात कांदा लागवड अधिक होईल, असा अंदाज आहे. पण नेमके क्षेत्र किती असेल, त्या अनुषंगाने बियाणे उपलब्ध होईल का याबाबत संदिग्धता आहे.

कृषी विभागाने खरिपाचा पीक पेरणी अंतिम अहवाल निश्‍चित केला आहे. त्यानुसार चारापिके, कांदा, भाजीपाला, मसाला पिके, सुंगधी, फुल, फळ पिके व उसाशिवाय सरासरीच्या ११४ टक्के पेरणी झाली आहे. यंदा कांद्याची १५ हजार ६२६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यंदा खरीप काळात पाऊस नसल्याचा खरिपातील कांदा लागवडीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरवर्षी रब्बी, उन्हाळी कांदा क्षेत्र अधिक असते तरीही खरिपात २० ते २५ हजार हेक्टरवरपर्यंत लागवडी होत असतात. यंदा पावसामुळे लागवडी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

खरिपातील तालुकानिहाय कांदा लागवड (हेक्टर)

नगर ः २२०५, पारनेर ः ९३०, श्रीगोंदा ः ४२४७, कर्जत ः १८९४, जामखेड ः ११२९, शेवगाव ः २६०, पाथर्डी ः १९२१, नेवासा ः २२२, राहुरी ः ७९२, संगमनेर ः १७९६, अकोले ः ०, श्रीरामपूर ३८, कोपरगाव ः १८८, राहाता ः ८२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT