Onion Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : आळेफाटा येथे कांदा लिलाव पाडले बंद

Onion Export : आळेफाटा या ठिकाणी कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काही काळ कांदा लिलाव बंद पाडण्यात आला.

Team Agrowon

Pune News : आळेफाटा या ठिकाणी कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काही काळ कांदा लिलाव बंद पाडण्यात आला. केंद्र सरकारने अचानकपणे कांद्याची निर्यात बंद केल्याने बाजारभाव कमी झाले. परिणामी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले होते.

सरकारने कांदा दर नियंत्रणासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांपूर्वी चाळीस ते पन्नास रुपये विकला जाणारा कांदा एकदम २० ते २५ रुपयांवर आल्याने शेतकरी संतप्त झाल्याने उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बाजार समितीत सुरू असलेले कांदा लिलाव बंद पाडले.

यामुळे काही काळ बाजार समिती परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी वरून सोनवणे, संतोष साळी, संभाजी आवारी, दादाभाऊ नरवडे, ज्ञानेश्वर शेटे, संपत काळे, सागर कुऱ्हाडे, गणेश आवारी, संतोष शिंदे आदी कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने वरूण सोनवणे म्हणाले की, कालपर्यंत कांद्याला एका किलोस ४०ते ५० रुपये बाजारभाव मिळत होता परंतु केंद्र सरकारने निर्यात बंद केल्याने बाजार भाव उतरल्याने शेतकऱ्यांनी आज लिलाव बंद पाडले आहेत. भविष्यात जर कांद्याला भाव मिळाला नाही तर आळेफाटा येथील चौकात रास्तारोको आंदोलन करणार आहोत, असा इशारा दिला.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रितम काळे, धोंडीभाऊ पिंगट, धनेश संचेती, पांडुशेठ गाडगे, सचिव रुपेश कवडे, शाखा व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या या वेळी समजून घेऊन चर्चा करुन आधी झालेले लिलाव रद्द करुन अडतदारांना परत फेरलिलाव करण्याचा सूचना दिल्या.

केंद्र सरकारने निर्यात बंदीचा जो निर्णय घेतला आहे हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. याचा तालुक्याचा लोक प्रतिनिधी म्हणून तीव्र शब्दांत निषेध करतो. राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करून निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी असून विधानसभेत अधिवेशनात मांडणार आहे.
- अतुल बेनके, आमदार, जुन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Demonstration: पैठण तालुक्यात ८२० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Climate Change Agriculture: बदलत्या हवामानाला अनुसरून नव्या संशोधनाची गरज

Disciplinary Action: बदलीसाठी दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

Maharashtra Fruit Farming: द्राक्ष, डाळिंब, केळीत भविष्य उज्ज्वल

Kharif Crop Demonstration: खरीप हंगामासाठी पीक प्रात्यक्षिकांसह बियाणे देणार

SCROLL FOR NEXT