Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : संपाचा फटका; सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद

Solapur Onion auction closed : नव्या मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला. ज्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी याची तिव्रता पाहायाला मिळाली. यादरम्यान राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या संपाचा फटका बसल्याचे उघड होत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव देखील बंद ठेवण्यात आले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Solapur News : केंद्र सरकारच्या हिट अँड रन या नव्या मोटारवाहन कायद्याविरोधात राज्यासह देशभरात संतोष पसरला आहे. ट्रक चालकांनी देशव्यापी आंदोलन सुरू केले. ज्याचा फटका राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बसला आहे. तसेच या संपामुळे आवक घडल्याने भाजीपाला महाग झाला आहे. तर याच संपाचा फटका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीलाही बसला आहे. येथील कांदा निलाव बुधवारी (ता. ३ रोजी) बंद ठेवण्यात येणार आहे.

ट्रक चालकांनी आंदोलन केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट यांच्यात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता. २ रोजी) पार पडली. त्यानंतर केंद्रीय गृहसचिव यांनी तूर्तास हा कायदा लागू होणार नसल्याचं सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा व्यवहार सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. तर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मालही येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कांद्याचे लिलाव बंद

ट्रक चालकांनी आंदोलन केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट यांच्यात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता. २ रोजी) पार पडली. त्यानंतर केंद्रीय गृहसचिव यांनी तूर्तास हा कायदा लागू होणार नसल्याचं सांगितले. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. मात्र तरिदेखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत या कायद्याविरोधात रोष दिसून आला. येथील कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना फटका

वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम झाला. शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारातून नेण्यासाठी वाहनचालक तयार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कांदा निलाव बंद ठेवण्याचा निर्णय कांदा व्यापाऱ्यांनी घेतला. तर याबाबत बाजार समितीत व्यापारी आणि वाहन चालक संघटना यांची बैठक होणार आहे. त्यानंतरच कांद्याच्या लिलाव बाबात पुढील वाटाघटी होणार आहेत. मात्र ऐन हंगामातच कांदा बाजार बंद राहिल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

उशीरा लोडींग

तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव हा लोडींग झाला नाही असे बोलले जात आहे. तर रात्री उशीरा वाहनांमध्ये लोडींग झाल्यामुळेच बुधवारी होणारा कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सलग दोन दिवस बाजार बंद

या आठवड्याच्या आधी रविवार आणि त्यानंतर सोमवारी भीमा कोरेगाव दिन अशा कारणामुळे सलग दोन दिवस येथील बाजार बंद ठेवण्यात आला होता. फक्त मंगळवारी कांद्याचे लिलाव झाले होते. पण त्यानंतर या संपामुळे लिलाव झाले नाहीत. तर आता उशिरा लोडींगच्या कारणामुळे पुन्हा बाजार बंद ठेवण्याची वेळ बाजार समितीवर आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT