Onion auction Ahmednagar Agrowon
ॲग्रो विशेष

Onion auction Ahmednagar : संपाचा कांद्यास फटका? लिलाव राहणार बंद

Hit and Run Act : हिट अँड रन कायद्याच्या विरोधात पुन्हा एकदा वाहतुकदार संघटनांनी संप पुकारला आहे. हा संप बुधवारपासून (१० रोजी) पुकारण्यात आला आहे. तर मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या कायद्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. तर याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Ahmednagar News : देशात हिट अँड रन कायद्याच्या विरोधात पुन्हा एकदा वातावरण चिघळताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा या कायद्याविरोधात मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या कायद्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. तर याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर नगर बाजार समितीत कांदा लिलाव गुरुवारी (दि.११) बंद ठेवण्यात येणार आहे.

काही दिवसांच्या आधीच या कायद्याला विरोध करण्यासाठी देशभर निदर्शने करण्यात आली होती. दरम्यान केंद्रीय गृहविभागाने यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर तो मागे घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा वाहतुकदार संघटनांनी संपाचे अस्त्र उपसले आहे. हा संप बुधवारपासून (१० रोजी) पुकारण्यात आला असून ज्याचा फटका राज्यातील कांदा उत्पादकांना बसत आहे. अनेक बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान नगर बाजार समितीत येणाऱ्या नेप्ती उपबाजारातीत कांदा लिलाव आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय दि. अहमदनगर फळफळावळ व आडते असोसिएशनने घेतला आहे. तसेच हा निर्णय घेताना असोसिएशनने बाजार समिती प्रशासनास पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी वाहतुकदार संघटनांचा संपाचा उल्लेख करत शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारात आणू नये असे आवाहन केले आहे.

तसेच असोसिएशनने, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला शेतमाल हा संपामुळे इतर राज्यात पाठविण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. तो माल पोहचविण्यासाठी वाहने उपलब्ध होणार नाहीत असेही म्हटलं आहे.

त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने असोसिएशनची मागणी आणि वाहतुकदारसंघटनेच्या संपामुळे गुरुवारी (दि.११) होणारा कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फटका आधीच अडचणीत असणाऱ्या कांदा उत्पादकांना बसत आहे.

वाहतुकदारसंघटनेच्या संप आणि शेतमालाची होणारी न उचल लक्षात घेता गुरुवारी (दि.११) होणारा कांदा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी शेतकऱ्यांनी आपला कांदाविक्रीसाठी नेप्ती उपबाजारात आणू नये असे आवाहन सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ यांच्यासह सचिव अभय भिसे यांनी केले आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT