Lasalgaon market committee Agrowon
ॲग्रो विशेष

Lasalgaon Onion Market : कांदा दराच्या घसरणीत लिलाव पुन्हा सुरू

Lasalgaon market committee : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. यामुळे शेतकरी संतापला आहे. या संतापाचा आज उद्रेक लासलगाव बाजार समितीत पाहायला मिळाला. कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला होता.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी करत आहे. मात्र सरकारने कानावर हात ठेवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. या संतापाचा आज सोमवारी (२९ रोजी) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्रेक झाला. तर शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. सुमारे २ तासानंतर आता येथे कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. मात्र ९ ते १० रूपये प्रतिकिलो कांद्याचा दर झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून नाव लौवकीक असणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. तर केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा थेट फटका कांदा उत्पादन शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसत आहे. येथील कांदा उत्पादन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणाच्या आधी सरासरी १८०० ते २००० दर कांद्याला मिळत होता. मात्र निर्यातबंदीच्या निर्णयानंतर यात चांगलीच घरसण झाली. यानंतर आता लासलगाव बाजार समितीत कांद्यांचा भाव हा ५०० ते १००० रूपयांच्यामध्ये आहे. त्यामुळे पिकवताना जेवढा खर्च केला आहे. तोही निघत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

दरम्यान सतत पडणाऱ्या कांद्याच्या दर आणि सरकारच्या निर्यातबंदी धोरणाविरोधात आज शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत निषेध व्यक्त केला. तसेच कांदा निर्यातबंदी उठवावी ही मागणी करत कांदा लिलाव बंद पाडला होता. तो आता सुमारे २ तासानंतर पुन्हा सुरू झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT