Onion Rate agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कर्नाटकातून कांद्याची आवक वाढली, दरामध्येही चढ उतार?

Karnatak Onion Rate : बेळगाव, हुबळी या कर्नाटक जिल्ह्यांतून कांद्याची नवी आवक सुरू झाल्याने ४ हजार ८०० स्थिर असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Onion Rate : कोल्हापूरच्या सीमाभागातील बाजारात कर्नाटकातून कांद्याची नवी आवक सुरू झाली आहे. मात्र, मागणी अधिक असल्याने दरात चांगलीच तेजी असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या बिन्सची आवक कमी झाल्याने दरात किलोमागे २० रुपयांची वाढ झाली आहे. सर्वच फळभाज्यांच्या भावात मागणीमुळे किलोमागे २० ते ३० रुपयांनी दर वाढले आहेत. आठवड्यापूर्वी विक्रमी झालेल्या फुलांचे दर गपणती विसर्जनामुळे आवाक्यामध्ये आले आहेत. लसणाच्या दरातील तेजी कायम आहे. फळबाजारात सफरचंदाचे दर थोडे नरम झाले आहेत.

गणेशोत्सवामुळे बहुतांश शाकाहारावर भर असतो. त्यामुळेच भाजी मंडईत सर्वच फळभाज्यांना अधिक मागणी वाढली होती. यामुळे किलोमागे २० ते ३० रुपयांनी दर वाढले आहेत. हिरवी मिरची, ढब्बू, दोडका, कारली, गवार यांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसे येत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टोमॅटो, कोबी, दिडगा दर टिकून आहे. पंधरवड्यापासून वाढलेल्या कोथिंबिरीचा दर थोडा उतरला आहे. शंभर पेंढ्यांचा दर १००० रुपयांनी उतरून ३००० वर स्थिरावला आहे. परिणामी, पेंढीचा दर ५० वरून ३० रुपयांवर आला. पालेभाज्या अद्याप कमीच असल्याने १० ते १५ रुपये पेंढी असे दर अधिक आहेत.

बेळगाव, हुबळी या कर्नाटक जिल्ह्यांतून कांद्याची नवी आवक सुरू झाल्याने ४ हजार ८०० स्थिर असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. क्विंटलचा २ हजार ५०० रुपयांपर्यंत दर आहे. बटाट्याचे आकारानुसार भाव आहेत लसणाच्या क्विंटलमागे २० रुपयांनी दर वाढले आहेत. फळबाजारात टिकून असून, १०० ते १५० रुपयांपर्यंत दर्जानुसार दर आहेत.

डाळिंबाचे दर जास्त असून, प्रतही चांगली नाही. किलोचा १५० ते २५० रुपयांपर्यंत दर होते. सीताफळ, पेरू, चिक्कू ८० ते १०० रुपये किलो आहेत. जनावरांच्या बाजारात सव्वा महिन्यापासून शेळ्या-मेंढ्यांना मागणी घटली होती. श्रावण झाल्यामुळे बकऱ्यांना मागणी असून, ७ ते २० हजारांपर्यंत दर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे

Natural Industries Group: ‘नॅचरल’ला ५५ कोटी नऊ लाख रुपये नफा

Peek Pahani : 'पीक पाहणी'बाबत सरकारचा मोठा निर्णय, पीक विमा मदतीचा अडथळा दूर

AI in Farming: शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा : डॉ. पाटील

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; वांगी आवक स्थिर, शेवग्याला मागणी कायम, ज्वारीचे दर कमीच तर बाजरीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT