Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Crop Insurance : खरिपासाठी एक रुपयात पीकविमा योजना लागू

Kharif Season : खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पीकविमा योजना नांदेड जिल्ह्यात लागू झाली आहे. या योजनेअंतर्गत ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद व मूग या पिकांसाठी विमा भरता येईल.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पीकविमा योजना नांदेड जिल्ह्यात लागू झाली आहे. या योजनेअंतर्गत ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद व मूग या पिकांसाठी विमा भरता येईल. शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पीकविमा पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. राज्य शासनाने सर्व समावेशक पीकविमा योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत केवळ एक रुपया भरून पीकविमा उतरविता येणार आहे.

या योजनेत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व, लावणीपूर्व नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चाश्‍चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान याबाबींचा समावेश करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद व मूग या पिकांसाठी पीकविमा भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसांची वाट न बघता पीकविमा योजनेमध्ये लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन बऱ्हाटे यांनी केले आहे.

प्रति अर्ज एक रुपया सीएससी चालकांना द्यावे

विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी चालकास रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. हे मानधन संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी चालकास दिले जाते. त्यामुळे प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम चालकांना द्यावे, यापेक्षा अधिकचे पैसे देवू नये, असे कळविले आहे.

पीकविमा योजनेची वैशिष्ट्ये

पेरणी झाली असेल किंवा झाली नसेलतरी विमा भरता येणार

कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेचा सहभाग ऐच्छिक

एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभाग घेता येणार

पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र सादर करून १५ जुलैपर्यंत सहभाग घेता येणार

पीकनिहाय संरक्षित रक्कम (प्रतिहेक्टर)

पीक संरक्षित रक्कम

सोयाबीन ५४,५००

कपाशी ५७,५००

ज्वारी ३०,०००

तूर ३६,८०२

मूग २२,५००

उडीद २२,५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT