River Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Krishna River Pollution : एकच मिशन, थांबवा कृष्णा प्रदूषण

नदी प्रदूषण मुक्तीसाठीच्या लोकलढ्याची ही सुरवात आहे, प्रदूषणाला कारणीभूत घटकांना वेळीच रोखा, अन्यथा याची व्याप्ती वाढत जाईल, असा इशारा संयोजक नागरिक विकास मंचने दिला.

Team Agrowon

Sangli News : कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे (Krishna river pollution) आज मासे मेले आहेत, उद्या माणसे मरतील. जीवनवाहिनी कृष्णा नदीचे प्रदूषण थांबवा, स्वच्छ पाणी आमचा हक्क आहे, असा नारा देत सांगलीकरांनी शनिवार (ता. २५) कृष्णाकाठी मानवी साखळी केली.

त्याला सांगली, मिरज, सांगलीवाडी, हरिपूरसह कृष्णाकाठच्या गावांतून आलेल्या लोकांनी उदंड प्रतिसाद दिला.

नदी प्रदूषण मुक्तीसाठीच्या लोकलढ्याची ही सुरवात आहे, प्रदूषणाला कारणीभूत घटकांना वेळीच रोखा, अन्यथा याची व्याप्ती वाढत जाईल, असा इशारा संयोजक नागरिक विकास मंचने दिला. ‘सकाळ’ने या लोकलढ्यात सक्रिय सहभाग घेत ‘सकाळ आहे सोबतीला’ असा नारा दिला.

सकाळी सातपासून कृष्णाकाठी लोक जमू लागले. हाती झेंडे घेऊन स्केटिंगपटून हरभट रोडवरून फेरी मारली. आवाहन करत जीप व रिक्षा फिरली आणि लोकांची संख्या वाढत गेली. टिळक चौकातून साखळी सुरु झाली आणि ती महापिलेपर्यंत पोहचली.

चौकात विविध घटकांनी एकजूट दाखवत घोषणा दिल्या. भाजीपाला खरेदीला आलेला सामान्य सांगलीकर, शाळकरी विद्यार्थी, गेली अनेक दशके निसर्ग संवर्धनासाठी राबणारे कार्यकर्ते, पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू यांनी हातात हात गुंफत एकीचा नारा दिला.

‘एकच मिशन, हटवू कृष्णा प्रदूषण’, ‘नको मळी, नको नाला, आळा घाला प्रदूषणाला’, ‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

सहभागी संस्था...

आभाळमाया फौंडेशन, डॉल्फिन नेचर ग्रुप, रोटरी क्लब, स्पंदन ग्रुप, शेतकरी संघटना, जायंट्स ग्रुप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संवाद ग्रुप, रेड स्वस्तिक ग्रुप, इन्साफ फौंडेशन, विसावा मंडळ, कृष्णामाई जलतरण संस्था, मराठा क्रांती मोर्चा, क्रेडाई, डब्ल्यूआरसी टीम, लाईफ केअर, मेक ऑन्स सोसायटी, लाईफ लाईन रेस्क्यू टीम, सांगली स्पोर्टस फौंडेशन, वृत्तपत्र विक्रेता संघटना.

पीठाची चक्की बसवायची झाली तर प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घ्यावी लागते. एवढी नदी प्रदूषित केली जातेय, त्यात वीष सोडले जातेय, तरी यंत्रणा गप्प कशी? आरोग्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या योजना राबवतानाच रोग होऊच नये म्हणून पाणी शुद्ध देणे ही सरकारची जबाबदारी नाही का? पूर्वी नदीत उतरून ओंजळीने पाणी पिले जात होते. आज धाडस होईलय कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, त्याचे कारण हे प्रदूषणच आहे. कुठल्याही औद्योगिक प्रकल्पाने एक थेंब पाणी बाहेर सोडायचे नाही, हा कायदाच आहे. त्यांचे कान वेळीच धरले पाहिजेत.
राजू शेट्टी, माजी खासदार
कृष्णा नदीचे प्रदूषण हे कारखानदारीमुळे आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होते आहे. जनावरे, माणसांचे जीवन धोक्यात आहे. उद्योजकांचे नको तितके लाड झाल्याने ही अवस्था झाली आहे. पाणी शुद्ध झालेच पाहिजे. कृष्णा नदीच्या प्रदूषणाने माणूस, पशू सगळेच धोक्यात आहेत. मूठभरांचे लाड करताना ढीगभरांच्या आयुष्याशी तुम्ही का खेळताय.
रघुनाथदादा पाटील, शेतकरी नेते
कृष्णाकाठी जमलेली गर्दी ही प्रदूषण करणाऱ्यांना, त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना खणखणीत इशारा आहे. राज्य शासनाने बैठका, प्रस्ताव, आराखड्यांत वेळ घालवू नये. तत्काळ उपाय योजना कराव्यात. पुढील आठ दिवसांत साखर कारखाने, डिस्टिरलीचे पाणी नदीत सोडणे बंद करावे. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊ.
पृथ्वीराज पवार, संयोजक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: अर्थसंकल्पात कृषी पायाभूत निधीची कर्जमर्यादा वाढणार का नाही; संभ्रम कायम

Karan Fries Cow: दुग्धव्यवसायाला नवे बळ; 'करन फ्राईज' गायीला ICAR कडून अधिकृत मान्यता

Crop Damage: दारवाड कालवा ‘ओव्हर फ्लो’; सत्तर एकर क्षेत्राचे नुकसान

Mushroom Product Training: मशरूम उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण

Illegal Raisin Import: ...अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ

SCROLL FOR NEXT