Jal Jeevan Mission  Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jeevan Mission : एक लाख कुटुंबे नळजोडणीच्या प्रतीक्षेत

Tap Water Scheme : ‘हर घर नल से जल’ हे ब्रीदवाक्य घेऊन केंद्र शासनाने जलजीवन मिशन कार्यान्वित केले. या अंतर्गत जिल्ह्याला ५ लाख २२ हजार ८८४ एवढे उद्दिष्ट होते.

Team Agrowon

Yavatmal News : ‘हर घर नल से जल’ हे ब्रीदवाक्य घेऊन केंद्र शासनाने जलजीवन मिशन कार्यान्वित केले. या अंतर्गत जिल्ह्याला ५ लाख २२ हजार ८८४ एवढे उद्दिष्ट होते. आतापर्यंत ४ लाख १९ हजार ७०७ लाभार्थ्यांना नळजोडणी केली. तर तब्बल एक लाख ३ हजार १७७ लाभार्थी आताही नळजोडणीच्या प्रतीक्षेत आहे. ही प्रतीक्षा कधी संपणार, असा प्रश्‍न लाभार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.

जलजीवन मिशन योजनेतून प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याचा शासनाचा मानस होता. त्या अनुषंगाने कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनेला सुरवात होऊन आता पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. एकूण एक हजार ५३९ कामे मंजूर करण्यात आली आहे.

सुरवातीला मोठ्या प्रमाणात निधी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला मंजूर झाला होता. मंजुरीनंतर प्रत्यक्षात कामांना सुरवात झाली. यामध्ये गावात पिण्याच्या पाण्याची टाकी, विहीर, वितरण व्यवस्था आणि प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी देण्यात येणार होती. यामध्ये ५ लाख २२ हजार ८८४ कुटुंबाचा समावेश होता.

सुरवातीला नळजोडणी अतिशय गतिमान पद्धतीने झाली. आतापर्यंत ४ लाख १९ हजार ७०७ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. नळजोडणी दिल्यानंतरही बहुतांश गावात पाणी पुरवठा योजना चालूच झाली नाही.

परिणामी, नळ केवळ शोभीवंत वस्तू बनलेले आहे. निधी नसल्यामुळे कामे ठप्प पडली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून सातत्याने निधीची मागणी केली जात आहे. परंतु शासनस्तरावरून निधी वळता केल्याच जात नाही. अधून-मधून आलेला निधी वितरित करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT