
Sangali News: जिल्ह्यातील ‘जलजीवन मिशन’ची सर्व कामे गत वर्षी ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश होते. त्यानंतर तीनदा मुदतवाढ दिली असून जलजीवन मिशनची कामे रखडलेलीच असल्याचे चित्र आहे. एकूणच, कामांची गती पाहता केंद्र सरकारनेही या योजनेला २०२८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जिल्ह्यात ६८३ योजनांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यातील ३८६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अद्याप सुमारे ३०० कामे सुरू आहेत. पूर्ण झालेल्या कामांतील केवळ १९६ योजनांचे हस्तांतरण झाले आहे. याआधी मुदतवाढीमुळे योजनेच्या खर्चात १३२ कोटींची वाढ झाली होती.
आता आणखी मुदतवाढ दिल्याने योजनेच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे योजनांचा पांढरा हत्ती बनत चालला आहे. सुरुवातीचा खर्च ७९२ कोटी २१ लाखांचा अपेक्षित होता.
प्रत्यक्षात हा खर्च आता ९२४ कोटींवर गेला आहे. या निधीतील आतापर्यंत ४३० कोटी रुपये खर्च झाला आहे. अद्याप सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा निधी वेळेत उपलब्ध झाला तर कामे होत राहणार आहेत. मात्र शासनाकडून निधी मिळत नसल्याने कामांवर परिणाम झाला आहे.
चार महिन्यांत केवळ २३ कामे पूर्ण
यंदा फेब्रुवारीमध्ये या योजनेतील ३६३ कामे पूर्ण झाली होती. त्यानंतर जूनपर्यंत केवळ २३ कामे पूर्ण झाली आहेत, तर योजना हस्तांतर होण्याचे प्रमाणही कमी आहे. चार महिन्यांत २२ योजनांचे हस्तांतर करण्यात आले आहे.
अद्याप ३२० योजनांची कामे सुरू आहेत, तीही कासवाच्या गतीने. त्यामुळे स्वतःच्या घरात नळातून पाणी येण्याची प्रतीक्षा ग्रामस्थांना आणखी काही काळ करावी लागणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.