Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी एक लाख ३४ हजार अर्ज

Women Scheme : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत पुणे जिल्हा परिषदेमार्फत अर्ज भरून घेतले जात आहेत.

Team Agrowon

Pune News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत पुणे जिल्हा परिषदेमार्फत अर्ज भरून घेतले जात आहेत. आत्तापर्यंत एकूण १ लाख ३४ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ऑफलाइन पद्धतीने ८९ हजार ९७ अर्ज आले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने ८९ हजार ९७ अर्ज, तर ऑनलाइन पद्धतीने ४५ हजार ४०१ असे एकूण १ लाख ३४ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही मिळून आंबेगाव तालुक्यात १६ हजार २७६ अर्ज प्राप्त झाले आहेत.

बारामतीत १७ हजार ५०९, भोर ४ हजार ३७६, दौंड ७ हजार १०८, इंदापूर १० हजार ८४, हवेली १० हजार ६६५, जुन्नर १२ हजार ८४३, खेड १० हजार ३४, मावळ १३ हजार १८३, मुळशी ५ हजार ४५६, पुरंदर ९ हजार ७१८, शिरूरला १५ हजार ८४२ वेल्हा तालुक्यात १ हजार ४३४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

गावातील अथवा त्या-त्या वॉर्डातील सर्व पात्र लाभार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने हार्ड कॉपी अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात येत आहेत. सर्व नोंद झालेल्या लाभार्थींच्या नावांचे प्रत्येक शनिवारी चावडी वाचन केले जाईल.

त्यात आक्षेप असल्यास पात्र, अपात्रतेबाबत गाव पातळीवरच खातरजमा करून तालुकास्तरावर समितीद्वारे अंतिम मान्यता दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थींना लाभ मिळावा, तसेच कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT