Scientist Dr. Bharat Raskar Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : ऊसशेतीत नियोजनपूर्वक काम केल्यास एकरी शंभर टन उत्पादन शक्य : रासकर

Scientist Dr. Bharat Raskar : सुधारित जातीचे दर्जेदार बियाणे वापर, दर तीन वर्षांनी बियाणे बदल यासह जमिनी सुपीकतेसह खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असा सल्ला पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे माजी शास्त्रज्ञ डॉ. भरत रासकर यांनी दिला.

Team Agrowon

Nashik News : राज्यात उसाची सरासरी उत्पादकता ३२ ते ३५ टन आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक काम केल्यास एकरी शंभर टन ऊस उत्पादन शक्य आहे. त्यासाठी सुधारित जातीचे दर्जेदार बियाणे वापर, दर तीन वर्षांनी बियाणे बदल यासह जमिनी सुपीकतेसह खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असा सल्ला पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे माजी शास्त्रज्ञ डॉ. भरत रासकर यांनी दिला.

चांदोरी (ता. निफाड) येथे केद्राई कृषी व ग्रामीण विकास संस्था आयोजित पुरस्कार वितरण समारंभ व ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘नवीन तंत्रज्ञानाने एकरी १०० टन ऊस उत्पादन’ या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. रासकर बोलत होते. या वेळी ‘केद्राई’चे अध्यक्ष वसंत शिंदे, नेटाफिम इरिगेशनचे ऊस विकास व प्रकल्प विभागाचे उपसरव्यवस्थापक ऊस तज्ज्ञ अरुण देशमुख आदी उपस्थित होते.

डॉ. रासकर म्हणाले, की पाडेगाव संशोधन केंद्राने गेल्या ९० वर्षांत १६ वाण दिले. साखर उद्योगाच्या मागणी व गरजेनुसार उसाच्या जाती प्रसारित केल्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

२०२३-२४ चे ‘केद्राई पुरस्कार’

बाळासाहेब क्षीरसागर - शिवडी, जि. नाशिक (सहकार, शिक्षण व बँकिंग क्षेत्र), रामभाऊ माळोदे - आहेरगाव, जि. नाशिक (सहकार, कृषी, उद्योग बँकिंग), चेतना सेवक - नाशिक (आरोग्य विषयक मदत कार्य), संघर्ष ग्रुप - पालखेड, जि. नाशिक (सामाजिक कार्य), राजेश्वर राजुरकर - चंद्रपूर (सेंद्रिय व विषमुक्त अन्नधान्य व पिके चळवळीत कार्य), विश्वनाथ कारे-सोनगाव, जि. नाशिक (प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी), बाळासाहेब पाटील - कोगे, जि. कोल्हापूर (१०० टन ऊस उत्पादक शेतकरी व ऊस पिकावर विस्तार कार्य),

मोतीराम मोगल - कोठुरे जि. नाशिक (सहकार व कृषी), सागर निकाळे -निफाड, जि. नाशिक (पत्रकारिता), योगेश बिडवई - लासलगाव, जि. नाशिक (कृषी पत्रकारिता), राजेंद्र पाटील - कोल्हापूर (साखर उद्योग), शिवाजीराव ढेपले - निफाड, जि. नाशिक (सहकार, शिक्षण व समाजकारण), डॉ. हेमंत दीक्षित - नाशिक (शिक्षण व उद्योग).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Model Village: या गावाला शाब्बासकी हवीच!

Election Commission : ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

Panchayati Raj : स्वातंत्र्यानंतर पंचायती राज व्यवस्थेचा विकास

Seed Bill 2025 : कृषी मंत्रालयाने नवीन बियाणे विधेयकाचा मसुदा केला जारी; ११ डिसेंबरपर्यंत सूचना पाठवता येणार

Bihar Election Results 2025: बिहारमध्ये 'एनडीए' द्विशतकाच्या दिशेने, सर्वात मोठा पक्ष कोणता?; RJD ला धक्का

SCROLL FOR NEXT