Nazre Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Nazre Dam : नाझरे धरण शंभर टक्के भरले, बळीराजा आनंदात

Team Agrowon

Pune News : मागील काही महिन्यांपासून नाझरे धरण कोरडे पडले होते. आता ते नाझरे धरण शंभर टक्के भरले आहे. तर पुरंदरसह बारामतीतील अनेक वाड्या-वस्त्या आणि गावे यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे कऱ्हा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नदीपात्रात कोणीही उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

नाझरे धरणावर पुरंदर तालुक्यातील जवळपास ४० गावे, तर बारामती तालुक्यातील १६ अशी एकूण ५६ गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. तर सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. तीर्थक्षेत्र जेजुरी शहर जेजुरी एमआयडीसी या धरणातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. नाझरे धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

धरणांची एकूण क्षमता ०.५९ टीएमसी एवढी क्षमता आहे. या धरणक्षेत्रात एक जूनचे आत्तापर्यंत सुमारे ४१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली होती. गेल्या वर्षी याच काळात या धरणक्षेत्रात अवघा १४४ मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा पडलेल्या पावसामुळे धरणांत एकूण ०.६४ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

शनिवारी (ता.१७) या धरणक्षेत्रात १५ मिलिमीटर पाऊस पडला असून, मागील चोवीस तासांमध्ये या धरणात ०.०१ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे या धरणांतून कऱ्हा नदीत सांडव्याद्वारे १६४३ क्युसेक, तर डाव्या कालव्याला ३० क्युसेक असा एकूण १६७३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली

राज्यात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली असून पावसाच्या पाण्याने धरणे तुडुंब होत आहेत. पुणे विभागातील बहुतांश धरणे आता भरत आली असून भाटघर, वीर आणि उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. खडकवासला, पानशेत, खडकवासला, मुळशी, टेमघर, पवना, शेटफळ, कळमोडी, गुंजवणी, येडगाव, वडज, घोड, डिंभे भरले आहे. सध्या या सर्व धरणांमधून विसर्ग सुरू असून मुळा, मुठा, भीमा, नीरा नदीपात्रात पाण्याची आवक होत आहे.

‘नदीपात्रात कोणीही उतरू नये’

नाझरे धरण १०० टक्के भरले असून नाझरे धरणात सध्या पाण्याचा येवा सुरू झालेला आहे. पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याच्या येव्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांने कऱ्हा नदीत १ हजार ६४२ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत, असे आवाहन नाझरे धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन मदतवाटपातील दिरंगाई ‘महसूल’मुळे नाही

Bihar Flood : बिहारमध्ये पूरस्थिती कायम; बागमती नदीवरील बंधारा फुटला

Sugar Market : कोटा घटविल्याने दसऱ्याला साखरेच्या दरात वाढ शक्य

Rabi Season 2024 : दमदार पाऊसमानामुळे ‘रब्बी’वर बळीराजाचा भर

Edible Oil Rate : आयात साठा शिल्लक असताना खाद्यतेलाचे दर का वाढविले?

SCROLL FOR NEXT