Dam Water
Water DamAgrowon

Dam Water Storage : अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

Water Project Update : यंदा प्रकल्पांच्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने सर्वच प्रकल्पातील जलसाठे वाढलेले आहेत.
Published on

Akola News : यंदा प्रकल्पांच्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने सर्वच प्रकल्पातील जलसाठे वाढलेले आहेत. प्रामुख्याने काटेपूर्णा, वाण या दोन मोठ्या प्रकल्पांमध्ये चांगला साठा तयार झाल्याने यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना, रब्बीतील सिंचनाचा प्रश्‍न बऱ्याचअंशी मार्गी लागला आहे.

जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाची क्षमता ९७.६७ दलघमी असून सध्या यात ८८.७३ टक्के म्हणजेच ८७.९४ दलघमी एकूण साठा तयार झालेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पात अधिक साठा तयार झालेला आहे. वाण हा जिल्ह्यातील दुसरा महत्त्वाचा प्रकल्प असून त्यात ६१.१३ टक्के साठा आहे. सध्या वाण प्रकल्पात ५२.४३ दलघमी एकूण साठा आहे. मागील वर्षी याच तारखेला ६५.४८ टक्के साठा झालेला आहे.

Dam Water
Water Stock : करपरामध्ये ८२ टक्के, तर मासोळीत ४७ टक्के जलसाठा

जिल्ह्यात या वर्षात गेल्या महिनाभरात सातत्याने पाऊस झालेला आहे. विशेषतः धरणक्षेत्रातील पावसाचा फायदा या प्रकल्पांना झाला. त्यामुळेच काटेपूर्णा, वाण, मोर्णा, निर्गुणा, दगडपारवा असे विविध प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. पावसाचा अद्याप दीड महिना उरलेला असून या काळात हे प्रकल्प संपूर्णतः भरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्याची भरलेली क्षमता व पुढील टप्प्यातील पाऊस लक्षात घेता काटेपूर्णा, दगडपारवा प्रकल्पांतून दोन ते तीन वेळा पाण्याचा विसर्गही करण्यात आला.

Dam Water
Dam Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांत १८८ टीएमसी पाणीसाठा

यंदा आजवर बहुतांश रिमझिम स्वरूपात तर भाग बदलून काही ठिकाणी जोराचाही पाऊस झाला. या पावसामुळे प्रकल्प भरण्यास मदत झाली. आता हे पाणी विविध पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून नागरिकांना प्यायला उपलब्ध होणार आहे. पुढील काळात रब्बी तसेच काही प्रकल्पातून उन्हाळी सिंचनासाठीही पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रकल्पांमधील १३ ऑगस्टचा साठा

प्रकल्प टक्केवारी

काटेपूर्णा ८८.७३

वाण ६२.१३

मोर्णा ८९.९६

निर्गुणा ९६.९८

उमा ४९.३८

दगडपारवा ८४.७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com