Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : नगरला खरीप पेरा सरासरीच्या सव्वाशे टक्के

Kharif Season : नगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा खरिपात साधारणपणे सात लाख हेक्टरवर पेरणी, लागवड होईल असा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने नियोजन केले आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सात लाख २९ हजार ४२५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी १२५ टक्के आहे. आता पेरणीचा कालावधी संपला असल्याने जवळपास पेरणी अहवाल अंतिम असणार आहे. यंदा तूर, सोयाबीनचे क्षेत्र दुप्पट असून मक्याचे क्षेत्र दीडपट आहे. बाजरीचे क्षेत्र यंदाही कमी झाले आहे.

नगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा खरिपात साधारणपणे सात लाख हेक्टरवर पेरणी, लागवड होईल असा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने नियोजन केले आहे. मात्र या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक भागात चांगला पाऊस झाला.

नद्या, नाल्यांना पाणी आले. त्यामुळे मशागती पूर्ण झालेल्या भागात पेरणी लवकर झाली. आतापर्यंत नगर जिल्ह्यात खरिपाचा पेरा सात लाख २९ हजार ४२५ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या १२५.८२ टक्के झाला आहे.

आता पेरणीचा कालावधी संपला आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी हीच अंतिम असेल असे बोलले जात आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत नगर तालुक्यात १३८ टक्के, पारनेर तालुक्यात १२३ टक्के, श्रीगोंदा तालुक्यात १५६.९३ टक्के, कर्जत तालुक्यात १४०.५७ टक्के, जामखेड तालुक्यात ११७.९९ टक्के, शेवगाव तालुक्यात १२५ टक्के, पाथर्डी तालुक्यात १२२ टक्के,

नेवासा तालुक्यात १२५ संगमनेर तालुक्यात १२५ टक्के, राहुरी तालुक्यात १२३ टक्के, संगमनेर ११०.४५, अकोले तालुक्यात १२५ टक्के, कोपरगाव तालुक्यात ११७ टक्के, श्रीरामपूर तालुक्यात ११५ टक्के आणि राहाता तालुक्यात १३० टक्के क्षेत्रावर पेरा झाला आहे. लवकर झालेल्या पावसाचा परिणाम सर्वच तालुक्यात लवकर आणि बऱ्यापैकी यंदा खरिपात क्षेत्रवाढ झाली आहे.

यंदा मका, सोयाबीन, तुरीचे क्षेत्र अधिक आहे. कापसाचे सव्वाशे टक्के क्षेत्र आहे. बाजरीचे क्षेत्र मात्र यंदाही कमी झाले आहे.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)

भात १८,९०१

ज्वारी ०

बाजरी ७६,३४९

नाचणी ०

मका ८९, ९३१

तूर ७५,०७४

मूग ५०,३८४

उडीद ६८,७१३

भुईमूग ४७१५

तीळ ५६

कारळे १६२

सूर्यफूल २६२

सोयाबीन १,८४,८१९

कापूस १,५५,६६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला युवक महोत्सवात दोन सुवर्णपदके

Sangli Vote Percentage : मतदानाचा टक्का वाढला; सांगलीत फायदा कोणाला?

Assembly Election Voting : अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेला मतदानात वाढ

Leopard Terror : अजिंठा डोंगर परिसरात बिबट्यांची दहशत

SCROLL FOR NEXT