Crop Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Advisory : थेट शेतावर जाऊन शास्त्रज्ञांनी दिला पीक व्यवस्थापन सल्ला

Ek Divas balirajasathi Campaign : यातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमांतर्गत बुधवारी (ता. १४) मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये थेट शेतावर जाऊन उन्हाळी पिकांची काढणी, खरीप हंगामातील पीक नियोजन फळ पिकांचे कीड, रोग व्यवस्थापन, काढणी पश्‍चात साठवणूक आदी विषयावर सल्ला दिला. चर्चासत्र, शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांची निराकरण करत संवाद साधला.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी पालम येथे शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन केले. या वेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. कलालबंडी, वरिष्ठ संशोधन सहायक एम. बी. मांडगे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. इंद्र मणी यांनी कृषी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. १८) आयोजित केलेल्या खरीप पीक परिसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

डॉ. गडदे यांनी सोयाबीन, कापूस, तूर लागवड तंत्रज्ञान, डॉ. कलालबंडी आणि वरिष्ठ मांडगे यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले. या उपक्रमात विस्तार शिक्षण संचालनालय, छत्रपती संभाजीनगर, खामगाव, तुळजापूर, बदनापूर येथील विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्रे, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर व फळ संशोधन केंद्र, संभाजीनगर, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाई, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प व विभागीय कृषी विस्तार केंद्र, संभाजीनगर, कापूस संशोधन केंद्र, नांदेड, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी या केंद्रातील डॉ. पी. आर. देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. संजय पाटील, डॉ. हनुमान गरुड, डॉ. भय्यासाहेब गायकवाड, डॉ. दीपक कच्छवे, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. दिप्ती पाटगावकर, डॉ. संजूला भवर, डॉ. बस्वराज पिसुरे, विजय पवार, डॉ. संजय देवकुळे, डॉ. पवन ढोके, इंदरोड आदी शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Relief: राज्यात नुकसानीपोटी ३३७ कोटींची मदत

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

Farm Road Registration : महिला शेतकऱ्याला शेत रस्ता नोंदीचा पहिला सातबारा

Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

SCROLL FOR NEXT