Annasaheb Patil Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Annasaheb Patil Scheme: अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेचा दीड लाख तरूणांना लाभ

Economic Development: मराठा समाजातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतून कर्जाच्या व्याज परताव्याचा लाभ दिला जातो.

Team Agrowon

Ahilyanagar News: मराठा समाजातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतून कर्जाच्या व्याज परताव्याचा लाभ दिला जातो. आतापर्यंत राज्यात दीड लाख लाभार्थ्यांना योजनेतून लाभ मिळाला आहे. सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. राज्यात आतापर्यंत १,२२२ कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे.

मराठा समाजातील तरुणांना रोजगार, व्यवसायासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज घेतले तर त्याचे व्याज महामंडळाकडून दिले जाते. विशेष करून वाहनांसह शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज आणि त्यावरील व्याज परतावा दिला जात आहे.

महामंडळाच्या योजनांद्वारे राज्यातील १ लाख ५० हजार लाभार्थ्यांना उद्योगासाठी १२,६०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, १,२२२ कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. या बाबत श्री. पाटील यांनी अहिल्यानगरला नुकतीच बैठक घेतली

उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, महामंडळाच्या विभागीय समन्वयक पल्लवी मोरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम, जिल्हा समन्वयक अमोल बोठे, कौशल्य विकास अधिकारी शुभदा पाठक उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून अधिकाधिक तरुणांनी लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न आहेत. व्याज परताव्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी विहित कालावधीत मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत. बॅंकांकडून अडवणूक होणार नाही याची महामंडळ काळजी घेत आहे.
नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : पावसाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करा

Sugarcane FRP : सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८०.९१ कोटींची एफआरपी थकीत

Marathwada Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार मंडलांत अतिवृष्टी

Protest For Onion Farmers: कांदा प्रश्नावर संसद परिसर दणाणला; विरोधी पक्षातील खासदारांची निदर्शने

Cattle Donation : आदिवासी लाभार्थ्यांना मोफत कालवडी वाटप

SCROLL FOR NEXT